— parthiv patel (@parthiv9) December 9, 2020पार्थिव पटेलने यावेळी लिहिलेल्या पत्रात बीसीसीआय आणि तो ज्या टीमकडून खेळला त्या सर्व टीमच्या कॅप्टनचे आभार मानले आहेत. पार्थिव आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमचा सदस्य होता. मात्र या आयपीएलमध्ये त्याला एकही मॅच खेळता आली नाही. पार्थिवच्या नेतृत्वाखालीच गुजरातच्या टीमने रणजी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विजेतेपद पटकावले होते. सतराव्या वर्षी पदार्पण पार्थिव पटेलने अगदी लहान वयात म्हणजे 17 वर्षे आणि पाच महिन्यांचा असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 2002 मधील इंग्लंड दौरा आणि त्यानंतर झालेल्या न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान दौऱ्याचाही तो सदस्य होता. पार्थिवने टेस्ट क्रिकेटमध्ये 31.13 च्या सरासरीने 934 रन्स काढले. तर वन-डे क्रिकेटमध्ये 23.7 च्या सरासरीने 736 रन्स काढले. (हे वाचा-IND A vs AUS A : पृथ्वी शॉने पकडला भन्नाट कॅच, पाहा VIDEO) कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या पार्थिव पटेलच्या खराब विकेट किपिंगवर त्याकाळात टीका झाली. मात्र, बॅट्समन म्हणून त्याने खेळात सुधारणा केली होती. अखेर, 2004 साली भारतीय क्रिकेटमध्ये ‘महेंद्रसिंह धोनी युग’ सुरु झाल्यानंतर पार्थिवने टीममधील स्थान गमावले. त्यानंतर 2008, 2016 आणि 2018 मध्ये त्याने टीममध्ये कमबॅक केले, मात्र एका मालिकेपेक्षा जास्त काळ तो टीममध्ये टिकला नाही. गुजरातला विजेतेपद पार्थिव पटेलच्या क्रिकेट कारकीर्दीमधील सर्वोच्च क्षण 2016 साली आला. त्यावर्षी गुजरातने मुंबईचा पराभव करत रणजी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. पार्थिव पटेलच्या नेतृत्वाखालीच गुजरातने ही ऐतिहासिक कामगिरी केली. पार्थिवनं फायनलमध्ये कॅप्टनला साजेसा खेळ करत शतक झळकावले होते. (हे वाचा-IND vs AUS : '...तर हार्दिक पांड्या टेस्ट खेळेल', विराट कोहलीचं स्पष्टीकरण) चेन्नई सुपर किंग्ज, डेक्कन चार्जर्स, कोची टस्कर्स, मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अशा सहा टीममकडून पार्थिव आयपीएलमध्ये खेळला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news