पुजाराचं शतक आणि रोहितच्या अर्धशतकाने विराटचं टेन्शन वाढलं

विंडीजविरुद्धच्या सराव सामन्यात भारतानं पहिल्या दिवशी 5 बाद 297 धावा केल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 12:40 PM IST

पुजाराचं शतक आणि रोहितच्या अर्धशतकाने विराटचं टेन्शन वाढलं

अँटिगुवा, 18 ऑगस्ट : भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारानं सहा महिन्यांनी पुनरागमन करताना वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड इलेव्हन संघाविरुद्ध शतकी खेळी केली. तीन दिवसाच्या सराव सामन्यातील पहिल्या दिवशी चेतेश्वर पुजारानं शतक तर रोहित शर्मानं अर्धशतक केलं. भारतानं पहिल्या दिवसी 88.5 षटकांत 5 बाद 297 धावा केल्या. चेतेश्वर पुजारानं 187 चेंडूत 8 चौकार आणि एाका षटकारासह शतक साजरं केलं. तर रोहित शर्मानं 68 धावा केल्या. लोकेश राहुल 36 तर ऋषभ पंत 33 धावांवर बाद झाले. या सामन्याचं नेतृत्व अजिंक्य रहाणेकडं आहे.

विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी एकमेव सराव सामन्यात भारताची सुरुवत खराब झाली. लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल लवकर बाद झाले. मयंक फक्त 12 धावांवर तर केएल राहुल 36 धावांवर बाद झाला.

कर्णधार अजिंक्य रहाणे फक्त एक धाव काढून बाद झाला. रहाणेला गेल्या दोन वर्षांत शतक करता आलेलं नाही. त्यानं 2017 मध्ये लंकेविरुद्ध शतक केलं होतं. सध्या त्याची निवड अंतिम अकरामध्ये होऊ शकते मात्र आगामी आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला या दौऱ्यात चांगली कामगिरी गरजेची आहे.

भारताचे तीन गडी 53 धावांवर तंबूत परतले होते. यावेळी चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा यांनी 132 धावांची भागिदारी केली. अकीम फ्रेजरनं रोहित शर्माला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर पुजारा आणि हनुमा विहारी यांनी चहापानापर्यंत सावध खेळ केला. रोहित शर्मानं 115 चेंडूत 8 चौकार आणि एका षटकारासह 68 धावा केल्या. यामुळं कसोटीच्या अंतिम 11 मध्ये रोहितनं एक प्रकारे दावाच केला आहे. यामुळं प्लेइंग इलेव्हनची निवड करण्याचं टेन्शन विराटला असेल.

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. जोनाथन कार्टरनं त्याला पायचित केलं. टी20 मध्ये अखेरच्या सामन्यात त्यानं अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर एकदिवसीय मालिकेत फलंदाजीत तो अपयशी ठरला होता. तसेच बेजबाबदार फटका मारल्यानं त्याच्यावर टीकाही झाली आहे.

Loading...

'माय नेम इज यश खान', मुस्लीम आडनावामुळे पिंपरी पोलिसांकडून नाट्य कलाकाराची झडती!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 18, 2019 12:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...