• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • नॉर्कियाचा बाऊन्सर लागल्यामुळे मैदानातच आली चक्कर, विंडीजचा खेळाडू मॅचबाहेर, Video

नॉर्कियाचा बाऊन्सर लागल्यामुळे मैदानातच आली चक्कर, विंडीजचा खेळाडू मॅचबाहेर, Video

क्रिकेटच्या मैदानात अनेकवेळा अपघात झाल्याचं आपण पाहिलं आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमध्ये (WI VS SA) सुरू असलेल्या पहिल्या टेस्टमध्येही अशीच घटना घडली. मॅचच्या पहिल्याच दिवशी वेस्ट इंडिजच्या टॉप ऑर्डरचा बॅट्समन एनक्रुमाह बॉनर (Nkrumah Bonner) याला दुखापत झाली.

 • Share this:
  मुंबई, 11 जून : क्रिकेटच्या मैदानात अनेकवेळा अपघात झाल्याचं आपण पाहिलं आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमध्ये (WI VS SA) सुरू असलेल्या पहिल्या टेस्टमध्येही अशीच घटना घडली. मॅचच्या पहिल्याच दिवशी वेस्ट इंडिजच्या टॉप ऑर्डरचा बॅट्समन एनक्रुमाह बॉनर (Nkrumah Bonner) याला दुखापत झाली, त्यामुळे तो या टेस्टमधून बाहेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर एनरिक नॉर्कियाचा (Anrich Nortje) फास्ट बॉलर एनक्रुमाहच्या हेल्मेटला लागला, यानंतर त्याला चक्कर यायला लागली आणि डोकं दुखायला लागलं. वेस्ट इंडिजची इनिंग संपल्यानंतर बॉनर फिल्डिंगला आला नाही, यानंतर आता तो उरलेल्या सामन्यामध्येही खेळणार नाही, असं वृत्त समोर आलं आहे. बॉनरच्या जागी कायरन पॉवेलला कनकशन सबस्टिट्युट म्हणून निवडण्यात आलं आहे. एनक्रुमाह बॉनरसोबत ही घटना 12व्या ओव्हरमध्ये झाली. बॉनर शाय होपची विकेट गेल्यानंतर मैदानात उतरला आणि नॉर्कियाने पहिल्याच बॉल बाऊन्सर टाकला. नॉर्कियाचा हा बॉल ताशी 143 किमी वेगाने बॉनरच्या डोक्यावर आदळला. यानंतर बॉनरने लगेच हेल्मेट काढलं तेव्हा त्याला चक्कर आली, पण तरीही तो मैदानात राहिला, यानंतर तो 31 बॉल खेळला. बॉनरला रबाडाने 10 रनवर आऊट केलं. आऊट झाल्यानंतर बॉनर पॅव्हेलियनमध्ये गेला तेव्हा त्याचं डोकं दुखायला लागलं, त्यामुळे वेस्ट इंडिजने त्याला फिल्डिंगसाठी उतरवलं नाही. कायरन पॉवेलला कनकशन सबस्टिट्यूट करण्यात आलं. पुढच्या इनिंगमध्ये पॉवेल बॅटिंगलाही उतरेल. मैदानात खेळाडूच्या डोक्याला बॉल लागला तर कनकशन सबस्टिट्यूट देण्याचा नवा नियम आयसीसीने केला आहे. वेस्ट इंडिजचा या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये फक्त 40.5 ओव्हरमध्ये 97 रनवर ऑल आऊट झाला. वेस्टइंडिजचे 6 बॅट्समन दोन आकडी रनपर्यंतही पोहोचू शकले नाहीत. दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर लुंगी एनगिडीने 19 रन देऊन 5 विकेट घेतल्या, तर नॉर्कियाला 4 विकेट मिळाल्या.
  Published by:Shreyas
  First published: