Home /News /sport /

WI vs ENG : शेवटच्या ओव्हरला 30 रनची गरज, 1w • 4 4 1w 6 6 6 रन आणि मग...

WI vs ENG : शेवटच्या ओव्हरला 30 रनची गरज, 1w • 4 4 1w 6 6 6 रन आणि मग...

इंग्लंडने दुसऱ्या टी-20 मध्ये वेस्ट इंडिजचा (West Indies vs England) 1 रनने पराभव केला. याचसोबत इंग्लंडला 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी साधता आली आहे. अत्यंत रोमांचक अशा सामन्यात अखेरच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजला विजयासाठी 30 रनची गरज होती.

पुढे वाचा ...
    बारबाडोस, 24 जानेवारी : इंग्लंडने दुसऱ्या टी-20 मध्ये वेस्ट इंडिजचा (West Indies vs England) 1 रनने पराभव केला. याचसोबत इंग्लंडला 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी साधता आली आहे. अत्यंत रोमांचक अशा सामन्यात अखेरच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजला विजयासाठी 30 रनची गरज होती. अखेरच्या 5 बॉलला अकिल हुसैनने (Akeal Hosein) 3 सिक्स आणि 2 फोरच्या मदतीने 27 रन ठोकले. अकिल हुसैनच्या या धमाक्यानंतरही वेस्ट इंडिजला विजय मिळवता आला नाही. हुसैनने नवव्या विकेटसाठी शेफर्डसोबत 4.5 ओव्हरमध्ये नाबाद 72 रनची पार्टनरशीप केली. मोईन अलीच्या (Moeen Ali) शानदार बॉलिंगमुळे अखेर इंग्लंडला विजय मिळाला. 172 रनच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या वेस्ट इंडिजची सुरूवात चांगली झाली नाही. 55 रनवरच वेस्ट इंडिजच्या 5 विकेट गेल्या होत्या. ओपनर शाय होप शून्य रनवर आऊट झाला तर ब्रेंडन किंगला 2 रनच करता आल्या. निकोलस पूरनने 24, डॅरेन ब्राव्होने 23 आणि कायरन पोलार्डने फक्त एक रन केले. आदिल रशीदने 2 आणि मोईन अलीने 3 विकेट घेत वेस्ट इंडिजचा स्कोअर 98/8 असा केला. यानंतर वेस्ट इंडिजचा लवकर ऑल आऊट होईल, असं वाटत होतं, पण अकिल हुसैन आणि रोमारियो शेफर्ड यांनी संघर्ष केला. दोघांनी ठोकले 9 सिक्स अकील हुसैन आणि रोमारियो शेफर्ड यांनी 72 रनची नाबाद पार्टनरशीप करून टीमला विजयाजवळ पोहोचवलं. अखेरच्या ओव्हरमध्ये त्यांना विजयासाठी 30 रनची गरज होती. साकिब महमूदने पहिला बॉल वाईड टाकला. यानंतर पहिल्या बॉलला अकीलला रन करता आली नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलला त्याने फोर मारली. यानंतर पुन्हा महमूदने वाईड बॉल टाकला. आता 3 बॉलवर वेस्ट इंडिजला 20 रनची गरज होती. तेव्हा अकीलने लागोपाठ तीन बॉलला तीन सिक्स मारल्या, तरीही वेस्ट इंडिजला पराभव पत्करावा लागला. अकील हुसैन 16 बॉलमध्ये 44 रनवर नाबाद राहिला. त्याने 3 फोर आणि 4 सिक्स मारले. शेफर्डने 28 बॉलमध्ये नाबाद 44 रन केले, यात एक फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. रॉयने केले सर्वाधिक रन याआधी टॉस हरल्यानंतर पहिले बॅटिंगला आलेल्या इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 171 रन केले. जेसन रॉयने सर्वाधिक 45 रनची खेळी केली. रॉयने 31 बॉलच्या या खेळीत 6 फोर आणि 2 सिक्स मारले. याशिवाय मोईन अलीने 24 बॉलमध्ये 31 रन केले. क्रिस जॉर्डनने 15 बॉलमध्ये 27 रन करून इंग्लंडचा स्कोअर 170 पर्यंत पोहोचवला. जेसन होल्डर आणि फेबियन एलनने 2-2 विकेट मिळवल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या