Home /News /sport /

WI vs AUS : 'ऑफ स्पिनर' पोलार्डने दिला ऑस्ट्रेलियन खेळाडूला इशारा, VIDEO VIRAL

WI vs AUS : 'ऑफ स्पिनर' पोलार्डने दिला ऑस्ट्रेलियन खेळाडूला इशारा, VIDEO VIRAL

क्रिकेटच्या मैदानात अनेकवेळा बॅट्समनना आऊट करताना मंकडिंगचा (Mankading) वापर केल्यामुळे वाद निर्माण होतो. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज (West Indies vs Australia) यांच्यातल्या तिसऱ्या वनडेमध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला. कायरन पोलार्डकडे (Kieron Pollard) मॅथ्यू वेडला मंकडिंग पद्धतीने आऊट करण्याची संधी होती.

पुढे वाचा ...
    मुंबई, 27 जुलै : क्रिकेटच्या मैदानात अनेकवेळा बॅट्समनना आऊट करताना मंकडिंगचा (Mankading) वापर केल्यामुळे वाद निर्माण होतो. अनेकजण याला योग्य मानतात, तर काहींना हा प्रकार जंटलमन्स गेमसाठी योग्य नसल्याचं वाटतं. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज (West Indies vs Australia) यांच्यातल्या तिसऱ्या वनडेमध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला. कायरन पोलार्डकडे (Kieron Pollard) मॅथ्यू वेडला मंकडिंग पद्धतीने आऊट करण्याची संधी होती, पण पोलार्डने वेडला इशारा देऊन सोडून दिलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलार्डला क्रिकेट रसिकांनी मध्यमगती बॉलिंग करताना बघितलं आहे, पण यावेळी तो ऑफ स्पिनर झाला. पोलार्डने बॉल टाकण्याच्याआधीच वेड क्रीजच्या बाहेर गेला असं वाटत होतं, पण रिप्लेमध्ये वेडने कोणताही नियम न मोडल्याचं समोर आलं. आयपीएल 2019 (IPL 2019) मध्ये आर.अश्विनने (R Ashwin) राजस्थान रॉयल्सचा बॅट्समन जॉस बटलरला (Jos Buttler) मंकडिंग पद्धतीने आऊट केलं होतं, यानंतर सोशल मीडियावर बराच वाद झाला होता. अश्विननेही आपण भविष्यातही जर बॅट्समनने अशाप्रकारे क्रीज सोडली तर आऊट करू, अशी रोखठोक भूमिका घेतली होती. कायरन पोलार्डच्या या प्रकारानंतर कपिल देव (Kapil Dev) यांचाही एक जुना व्हिडि सोशल मीडियावर व्हायरल झाला. 1992-93 साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कपिल देव यांनी पीटर कर्स्टन (Peter Kirsten) यांना मंकडिंग केलं. सीरिजच्या पहिल्या वनडेमध्ये कपिल देव यांनी नॉन-स्ट्रायकर एण्डच्या क्रीजवर उभ्या असलेल्या कर्स्टन यांना क्रीजबाहेर आल्यामुळे इशारा दिला होता. यानंतर दुसऱ्या वनडेमध्ये त्यांनी कोणताही इशारा न देता आऊट केलं. या व्हिडिओमध्ये कपिल देव प्रचंड भडकल्याचं दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये 6 विकेटने विजय झाला, याचसोबत ऑस्ट्रेलियाने वनडे सीरिज 2-1 ने जिंकली आहे. तिसऱ्या वनडेमध्ये मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) 3 विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजने दिलेले 153 रनचं आव्हान ऑस्ट्रेलियाने 30.3 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पूर्ण केलं. मॅथ्यू वेड 51 रनवर नाबाद राहिला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Australia, Cricket, Kieron pollard, West indies

    पुढील बातम्या