कर्णधारपद धोक्यात आल्यानं विराट विंडीज दौऱ्यावर? वाचा काय आहे सत्य

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराट विश्रांती घेणार अशी चर्चा होती मात्र आता त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर जाणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2019 01:26 PM IST

कर्णधारपद धोक्यात आल्यानं विराट विंडीज दौऱ्यावर? वाचा काय आहे सत्य

मुंबई, 24 जुलै : वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी भारतीय संघ रविवारी जाहीर करण्यात आला. कर्णधार विराट कोहलीच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्ध लढणार आहे. दरम्यान, विराट वर्ल्ड कपनंतर विश्रांती घेणार असल्याची चर्चा होती. मात्र, तो विंडीज दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर होताच कर्णधारपद जाण्याच्या भीतीने विराटनं हा निर्णय घेतल्याची चर्चा होऊ लागली. अखेर यावर उत्तर मिळालं आहे.

भारताला वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर संघासह विराट कोहलीवर टीका करण्यात आली. त्यापूर्वी विराट विंडीज दौऱ्यानंतर विश्रांती घेणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, वर्ल्ड कपनंतर अचानक विंडीज दौऱ्यावर जाण्यासाठी विराट तयार झाला. कर्णधारपद धोक्यात येऊ नये म्हणून विराट विंडीज दौऱ्यावर जात असल्याचं म्हटलं जात असलं तरी त्यामागचं सत्य वेगळंच आहे.

विराट कोहलीने विंडीज दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला कारण वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय खेळाडूं निराश झाले आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मनोबल उंचावणं गरजेचं असल्याची माहिती सूत्रांनी timesnownews.com ला दिली आहे. वर्ल्ड कपमधील पराभवानंतर खेळाडूंचा आत्मविश्वास कमी झाला आहे. अशा कठीण परिस्थिती संघाला सोडून नाही जाऊ शकत. आपल्यावरील जबाबदारी समजून घेऊन विराटने विंडीज दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला.

वर्ल्ड कपनंतर भारतीय संघात नेतृत्व बदल व्हावा अशी मागणी काही दिग्गज क्रिकेटपटूंनी केली होती. तीन प्रकारच्या क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंकडे नेतृत्व देण्याबाबत चर्चा होती. यात विराटकडे कसोटी आणि रोहित शर्माकडे एकदिवसीय, टी20 चे नेतृत्व देण्याची मागणी होत होती. मात्र, विंडीज दौऱ्यावर विराटकडेच नेतृत्व सोपवल्याने सर्व चर्चांना विराम मिळाला आहे.

INDvsWI : संघ निवडीवर गांगुलीचा आक्षेप, 'या' 2 खेळाडूंना संधी न दिल्यानं भडकला!

Loading...

VIDEO : प्रतिस्पर्ध्याचा जीवघेणा पंच, बॉक्सरचा झाला मृत्यू!

भारताच्या 3 दिग्गज खेळाडूंचा पहिला टी20 सामना ठरला होता अखेरचा!

VIDEO : भाडोत्री-मालकामध्ये राडा, बघ्यांनीसुद्धा हात साफ करून घेतले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2019 01:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...