नवी दिल्ली, 1 जून : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या आक्रमक शैलीवरून ओळखला जातोच. त्याच्या क्रिकेटमधील कामगिरीशिवाय त्याचा असलेला फिटनेस हा अनेकांसाठी चर्चेचा विषय असतो. योग्य फिटनेस ठेवण्यासाठी विराट नेमका काय करतोय याबाबत अनेकांना प्रश्न होता. यावर सोशल मीडियावर विराटनं उत्तर दिलं होतं त्यावरून आता वाद सुरू आहे.
विराट कोहलीला त्याच्या एका फॅन्सने डायट प्लॅनविषयी माहिती विचारली. त्यावर विराट कोहलीनं अगदी लगेच उत्तर दिलं. विराट म्हणाला, की मी भरपूर भाज्या, काही अंडी, दोन कप कॉफी, क्विंनोआ आणि भरपूर पालक खात असतो. मला डोसाही खूप आवडतो मात्र सर्व नियंत्रणात घेतलं जात.
That Virat Kohli eats eggs must not bemuse us, the gullible Janta. For assertions of his having turned VEGAN were just hogwash it seems. This VEGAN thing is being pushed with an agenda, the impact of which is sought to be global. It is not only about meat but also dairy.
— (@RajanIyengar13) May 31, 2021
कोहलीनं सांगितलेल्या डाएट प्लानवरून काहींनी त्याचे कौतुक केले. तर काहींनी अंड्याचं नाव ऐकून आश्चर्य व्यक्त केलं. कारण अगोदर एकदा विराट कोहलीनं सांगितले होते, की आपण विगन (VEGAN ) (असे लोक आहारामध्ये माऊस आणि डेअरी उत्पादने घेत नाहीत) झालो आहोत.
‘Vegan’ Virat Kohli reveals eggs in his quarantine diet, fans find it hilarious
— Cricket News & Score (@cricket_score) May 31, 2021
कोहलीने अगोदर एकदा सांगितलं होतं की, मला सरवाइकल स्पाईन चा त्रास झाला होता. त्यामुळं हाताच्या छोट्या बोटाला झिनझिन्या येतात. त्यावेळी माझ्यासाठी बॅट पकडणे देखील मुश्कील झाले होते. हा प्रकार 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंचुरियन कसोटी सामन्या दरम्यान झाला होता. त्यानंतर माझ्या पोटात ॲसिड वाढण्यास सुरुवात आहे. शरीरातील युरिक ॲसिड वाढले होते. त्यामुळे माझ्या पोटातील हाडांमधून कॅल्शियम कमी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे माझ्या पाठीच्या कण्यातील हाडांमध्ये समस्या झाली. मला मांसाहारी जेवण सोडावं लागलं, त्यामुळं मात्र मला सध्या खूप चांगलं वाटत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Virat kohali