पोटात दुखणं आणि मलावाटे रक्त पडणं किंवा मल रोखून धरण्याच्या क्षमतेवर परिणाम होणं ही धावपटूंची शारीरिक तक्रार अत्यंत सामान्य अशी मानली जाते. रनर्स डायरिया (Runners Diarrhoea) होण्यासाठी वय, आतड्यांमध्ये संसर्ग, फूड पॉयझनिंग, फूड अॅलर्जी किंवा डाएटरी फायबर कारणीभूत नसतात. लांब पल्ल्याच्या धावपटूंमध्ये ही तक्रार अधिक प्रमाणात दिसून येते. मॅरेथॉन धावणाऱ्या 90 टक्के स्पर्धकांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टिनल दबावाची लक्षणं दिसून येतात, असं एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.
जेव्हा हे धावपटू व्यायाम करतात, तेव्हा सिंपेथेटिक नर्व्हस सिस्टीम (Sympathetic Nervous System) स्प्लेनचेनिक अवयवांपासून ते कार्यरत स्नायूंपर्यंत रक्ताचा नवा प्रवाह वाहून नेते. जुना प्रवाह आणि नव्या रक्ताच्या प्रवाहादरम्यान रक्तप्रवाह कमी होतो यामुळे पोटातील अवयवांमध्ये एक जीआय (Gastrointestinal Ischaemia) नावाची स्थिती निर्माण होते. या जीआयमुळे डायरिया किंवा पोटदुखीची समस्या निर्माण होते. असा त्रास होऊ लागल्यावर उलट्या होण्याची देखील शक्यता असते, त्यामुळे मॅरेथॉन धावपटूंना आपल्या गुदद्वाराच्या स्नायूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात. नॉर्थ कॅरोलिना येथील नॉवेंट हॉस्पिटलचे रेक्टल सर्जन मायकल डॉबसन यांच्या म्हणण्यानुसार, धावपटू हा स्नायूंचा वापर करुन धावत असतो. अशा वेळी त्याला मलनियंत्रण करणं अत्यंत मुश्किल होतं. ज्यावेळी एखादी व्यक्ती तीव्र स्वरुपाची मेहनत करत असते, अशा वेळी त्या व्यक्तीस गुदद्वाराच्या स्नायूंवर (Anal Sphincters) नियंत्रण ठेवणं अवघड जातं. त्यामुळे लांब अंतर धावणाऱ्या मॅरेथॉन धावपटूंना या समस्येचा सामना करावा लागतो. कारण त्यांच्या पायाचे आणि पेल्विसचे स्नायू एकाच गतीने कार्यरत असतात. त्यामुळे मेंदुकडून तात्कालिक नियंत्रणाचा संदेश पोहोचवण्यात अडचणी निर्माण होतात. धावताना धावपटूंच्या पोटातील अन्न आणि पाणी सातत्याने घुसळत असतं. त्यामुळे त्यांच्यात शौच करण्याची भावना निर्माण होते.
2016 मध्ये फ्रान्सचा धावपटू योहान डिनिज एका आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान बेशुध्द पडला होता. परंतु, त्यानं आपलं धावणं सुरुच ठेवलं आणि 8 वा क्रमांक मिळवत त्यानं ही स्पर्धा पूर्ण केली. पोटाच्या त्रासामुळे तो बेशुध्द पडला होता. 2005 मध्ये लंडन मॅरेथॉन दरम्यान पॉला रेडक्लिफ हिने रस्त्याच्या कडेला मलविसर्जन केले. याची छायाचित्रे आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरली. हवाई आयर्नमॅन ट्रायथलॉनमध्ये ज्यूली मॉस हिला पोटदुखीमुळे पायाच्या स्नायूंवर नियंत्रण ठेवणं अवघड जाऊ लागलं. ती मलावर नियंत्रण ठेवू शकली नाही. यामुळे तिला खूप वाईट वाटलं आणि लाजिरवाण्या क्षणाला सामोरं जावं लागलं.
रनर्स डायरिया ही या तीनही धावपटूंच्या शारीरिक समस्येचं मूळ कारण आहे. 1992 मध्ये नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनमध्ये एक संशोधन प्रकाशित करण्यात आलं होतं. यात 109 मॅरेथॉन धावपटू आणि लांब अंतर धावणाऱ्या धावपटूंचा समावेश करण्यात आला होता. यावेळी त्यांना धावताना मलविसर्जन होण्याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. यातील 62 टक्के धावपटूंनी आम्ही ट्रेनिंग दरम्यान मलविसर्जनासाठी थांबल्याचं सांगितलं. 43 टक्के धावपटूंनी सांगितले की त्यांना स्पर्धेपूर्वी नर्व्हस डायरियाचा (Nervous Diarrhea) सामना करावा लागला. याचाच अर्थ स्पर्धेविषयी जास्त विचार केल्यानं तणाव निर्माण होऊन त्यांना मलविसर्जन करावे लागले होते. यातील 51 टक्के धावपटूंनी सांगितले की स्पर्धेदरम्यान आम्हाला मलविसर्जन करण्याची गरज पडली नाही. स्पर्धेदरम्यान आम्ही मलविसर्जनावर नियंत्रण ठेवू शकलो नाही आणि आम्हाला रस्त्यातच मलविसर्जन करावं लागल्याचं 12 टक्के धावपटूंनी सांगितलं. यालाच फुल ऑन फिकल इनकॉन्टिनन्स (Full on Fecal Incontinence) म्हणतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.