मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /India-Windies 2nd T20: भारत-विंडीज दुसरा टी20 सामना उशीरानं सुरु होणार! जाणून घ्या काय आहे कारण?

India-Windies 2nd T20: भारत-विंडीज दुसरा टी20 सामना उशीरानं सुरु होणार! जाणून घ्या काय आहे कारण?

भारतीय वेळेनुसार आजचा  भारत-विंडीज दुसरा टी20 सामना हा सेंट किट्सच्या वॉर्नर पार्क मैदानात आठ वाजता सुरु होणार होता. पण हा सामना आता रात्री 10 वाजता सुरु होणार आहे. काय आहेत या मागची कारणं जाणून घ्या.

मुंबई, 1 ऑगस्ट:  भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधला आजचा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना दोन तास उशीरानं सुरु होणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना सेंट्स किट्स इथं खेळवला जाणार आहे. पण दोन्ही संघांचं लगेज सामन्याच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाल्यानं सामन्याची वेळ पुढे ढकलण्यात आल्याचं वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं स्पष्ट केलंय. भारताच्या विंडीज दौऱ्यातली वन डे मालिका आणि त्यानंतर पहिला ट्वेन्टी ट्वेन्टी सामना त्रिनिदादमध्ये खेळवण्यात आला होता. पण आज दुसऱ्या टी20साठी दोन्ही संघ सेंट किट्समध्ये दाखल झाले. e/

सामना सुरु होण्यास झालेल्या विलंबामुळे क्रिकेट वेस्ट इंडिजनं दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यासोबतच चाहते, प्रायोजकांची माफी मागितली आहे. मालिकेतला तिसरा सामनाही सेंट किट्समध्येच होणार आहे. तर फ्लोरीडामध्ये उभय संघातला चौथा आणि पाचवा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना खेळवला जाईल.

हेही वाचा - टीम इंडियाच्या निशाण्यावर पाकिस्तानचा मोठा विक्रम! विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये हे काम करावे लागणार

मालिकेत टीम इंडिया आघाडीवर

दरम्यान टीम इंडियानं वन डे मालिकेत यजमान संघाला क्लीन स्वीप दिल्यानंतर ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेतही दणक्यात सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकची फलंदाजी आणि त्यानंतर भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर ट त्रिनिदादच्या पहिल्या टी20त भारतानं विंडीजचा 68 धावांनी धुव्वा उडवला होता. त्यामुळे सेंट किट्सची आजची दुसरी लढत जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.

रोहित विक्रमाच्या उंबरठ्यावर

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय टी20त 3 हजार 500 धावांचा पल्ला गाठण्यासाठी अजून 57 धावांची गरज आहे. रोहितनं आजच्या सामन्यात ही कामगिरी केल्यास तो आंतरराष्ट्रीय टी20त साडे तीन हजार धावा करणारा पहिलाच खेळाडू ठरेल. 129 सामन्यात रोहितच्या खात्यात आतापर्यंत 3 हजार 443 धावा जमा आहेत.

First published:

Tags: Rohit sharma, Sports, T20 cricket