मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs Aus: टीम इंडियाचं कुठे चुकलं? सामन्यानंतर कॅप्टन रोहित शर्मानं दिलं हे स्पष्टीकरण

Ind vs Aus: टीम इंडियाचं कुठे चुकलं? सामन्यानंतर कॅप्टन रोहित शर्मानं दिलं हे स्पष्टीकरण

टीम इंडिया

टीम इंडिया

Ind vs Aus: कांगारुंनी 4 विकेट्स राखून मोहालीची पहिली लढाई जिंकली. त्यामुळे सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माच्या चेहऱ्यावर पराभवाची निराशा स्पष्ट दिसत होती.

  • Published by:  Siddhesh Kanase
मोहाली, 20 सप्टेंबर: हार्दिक पंड्या, लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादवनं मोहाली टी20त भारतीय बॉलर्ससाठी बऱ्याच गोष्टी सोप्या करुन ठेवल्या होत्या. 209 धावांचं आव्हान टी20 क्रिकेटमध्ये फार मोठं मानलं जातं. त्यात मायदेशातल्या खेळपट्ट्यांचा चांगला अनुभव असलेल्या भारतीय बॉलर्सना ऑस्ट्रेलियन बॅट्समनवर वर्चस्व गाजवण्याची संधी होती. पण प्रत्यक्षात होम कन्डिशन्सचा फायदा घेण्याची संधी ऑस्ट्रेलियानं भारतीय बॉलर्सना दिलीच नाही. आणि 19.2 ओव्हर्समध्येच कांगारुंनी 4 विकेट्स राखून मोहालीची पहिली लढाई जिंकली. सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माच्या चेहऱ्यावर मात्र पराभवाची निराशा स्पष्ट दिसत होती. बॅट्समननी कमावलं, बॉलर्सनी गमावलं मोहालीत याआधीच्या तिन्ही मॅचमध्ये भारतानं दुसऱ्यांदा बॅटिंग करुन जिंकले होते. पण आज टॉस हरल्यानं भारताला आधी बॅटिंग करावी लागली. पण असं असतानाही हार्दिक, राहुल आणि सूर्यकुमारनं टीम इंडियाला धावांचा भला मोठा डोंगर उभारुन दिला. भारतानं 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 208 रन्स स्कोअर बोर्डवर लावले. पण त्यानंतर अक्षर पटेलचा अपवाद वगळता भारतीय बॉलिंग निष्प्रभ ठरली. अक्षर पटेलनं 4 ओव्हरमध्ये 17 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तर तीन वर्षानंतर टी20 सामना खेळणाऱ्या उमेश यादवनं 27 धावात 2 विकेट्स घेतल्या. भुवनेश्वर कुमार या सामन्यात प्रचंड महागडा बॉलर ठरला. त्यानं 4 ओव्हरमध्ये तब्बल 52 धावा दिल्या. 'बॉलिंगकडे लक्ष देण्याची गरज...' सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं भारतीय फलंदाजांचं तोंडभरुन कौतुक केलं. पण टीम इंडियाच्या बॉलिंग डिपार्टमेंटवर लक्ष देण्याची गरज असल्याचं रोहितनं म्हटलं. 209 हा चांगला स्कोर होता. पण आमच्या बॉलर्सनी आज चांगली कामगिरी केली नाही असं रोहितनं सामना संपल्यानंतर म्हटलं. दरम्यान मोहाली टी20 जिंकून ऑस्ट्रेलियानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतले आणखी दोन सामने बाकी असून 23 सप्टेंबरला नागपूरमध्ये तर 25 सप्टेंबरला हैदराबादला तिसरा टी20 सामना पार पडेल.
First published:

Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Sports

पुढील बातम्या