मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

FIFA WC 2022: फुटबॉल प्लेयर्स मॅच खेळताना ग्राउंडवर का थुंकतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण...

FIFA WC 2022: फुटबॉल प्लेयर्स मॅच खेळताना ग्राउंडवर का थुंकतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण...

फुटबॉल प्लेयर्स का जास्त थुंकतात?

फुटबॉल प्लेयर्स का जास्त थुंकतात?

FIFA WC 2022: फुटबॉल प्लेअर मैदानात ब्रेक दरम्यान जेव्हा कार्बोहायड्रेट द्रावणाने त्यांचं तोंड धुतात आणि थुंकतात तेव्हा त्या क्रियेला ‘कार्ब रिन्सिंग’ असं म्हणतात. या क्रियेत मेंदूला काहीसं फसवल्यासारखं करतात

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

जगभरातील फुटबॉलप्रेमींसाठी पर्वणी मानल्या जाणाऱ्या फिफा वर्ल्ड कप 2022 ला कतार येथे नुकताच प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने विविध देशांच्या फुटबॉल टीम आणि नागरिक कतारमध्ये दाखल झाले आहेत. फुटबॉल वर्ल्ड कपमुळे संपूर्ण कतारमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आतापर्यंत फुटबॉलच्या काही मॅचेस पार पडल्या आहेत. सर्वसाधारणपणे तुम्ही फुटबॉल किंवा क्रिकेट मॅच खेळताना प्लेअर ग्राउंडवर थुंकताना पाहिलं असेल. हे काहीसं कीळसवाणं कृत्य पाहिल्यानंतर ते असं का करत असतील, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. हे प्लेअर्स जाणीवपूर्वक असं कृत्य करत नाहीत. यामागे खास शास्त्रीय कारण असल्याचं तज्ज्ञ सांगतात. हे कारण नेमकं काय आहे, ते जाणून घेऊया.

प्लेयर्स मुद्दाम थुंकतात?

काही संशोधनानुसार, खेळादरम्यान शारीरिक व्यायाम मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे लाळेमध्ये स्रवित प्रथिनांचं प्रमाण वाढतं. विशेषतः लाळेत MUC5B नावाचा एक म्युकस स्रवतो. यामुळे लाळ घट्ट होते आणि ती गिळण्यास कठीण जातं. फुटबॉल मॅचच्या दरम्यान प्लेअर्सना मोठ्या प्रमाणात शारीरिक श्रम घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात या प्रकारची क्रिया होत असल्याने ते ग्राउंडवर थुंकतात. फुटबॉल प्लेअर मैदानात ब्रेक दरम्यान जेव्हा कार्बोहायड्रेट द्रावणाने त्यांचं तोंड धुतात आणि थुंकतात तेव्हा त्या क्रियेला ‘कार्ब रिन्सिंग’ असं म्हणतात. या क्रियेत मेंदूला काहीसं फसवल्यासारखं करतात, म्हणजे तो खेळाडू खरंच शरीरात कार्बोहायड्रेट घेत आहे असं मेंदूला भासवून त्याला उत्तेजित केलं जातं त्यामुळे शरीरातील कार्बोहायड्रेट्सवर तो काम करायला लागतो.

हेही वाचा - FIFA WC 2022: जपाननं फक्त मॅच नाही तर मनंही जिंकली... जगाला दिला 'हा' महत्वाचा संदेश, पाहा Video

कार्बोहायड्रेट रिन्सिंग म्हणजे नेमकं काय?

'कार्बोहायड्रेट रिन्सिंग' हे खरं तर चांगल्या परफॉर्मन्सशी संबंधित असू शकतं. 2004 मध्ये बर्मिंगहॅम विद्यापीठात केलेल्या अभ्यासात असं आढळून आलं की कार्ब रिन्सिंगमुळे 40 किलोमीटर सायकलिंग टाइम ट्रायल्स दरम्यान सायकलपटूंचा वेग सुमारे एका मिनिटाने वाढला. याबाबत 2017 मध्ये युरोपियन जर्नल ऑफ स्पोर्टस सायन्समध्ये अजून एक अभ्यास प्रकाशित झाला आहे. कार्ब रिन्सिंगमुळे परफॉर्मन्स वाढतो, असं या अभ्यासात म्हटलं आहे. त्यात 20 वर्ष वयोगटातील 12 निरोगी पुरुषांचा समावेश होता. कार्ब रिन्सिंगनंतर त्यांची उडी उंच गेली, त्यांनी जास्त बेंच प्रेस आणि स्क्वॅट मारले, वेगवान स्प्रिंट करण्याची क्षमता वाढली असं दिसून आलं.

हेही वाचा - FIFA WC 2022: धक्कादायक... वर्ल्ड कप दरम्यान रोनाल्डोवर मोठी कारवाई, 'या' कारणामुळे दोन सामन्यांची बंदी

नियमानुसार फुटबॉल प्लेअर, क्रिकेटर आणि रग्बी प्लेअर्स मॅचवेळी ग्राउंडवर थुंकण्याची परवानगी असते. मात्र टेनिस, बास्केटबॉल प्लेअर्सना ग्राउंडवर असं कृत्य केलं तर शिक्षा केली जाते. व्यायाम किंवा तीव्र स्वरुपाचे शारीरिक श्रम करताना हा म्युकस का तयार होतो, याचं कारण अस्पष्ट असलं तरी प्लेअर्स तोंडाद्वारे जास्त श्वास घेतात आणि त्यामुळे म्युकस तयार होऊन तो तोंडाला कोरड पडण्यापासून रोखतो, असं म्हटलं जातं. नायजेरिया फुटबॉल टीमचे माजी गोलकिपर जोसेफ दोसू यांनी सांगितलं की, ``फुटबॉल प्लेअर थुंकतात कारण त्यांना त्यांचा घसा साफ करण्यासाठी काहीतरी हवं असतं. ते कदाचित 10 ते 15 यार्ड धावतात अशावेळी त्यांना श्वास घेण्यासाठी हवेची गरज असते.``

First published:

Tags: FIFA, FIFA World Cup, Football