'धोनीमध्ये अद्याप बरीच क्षमता, मग निवृत्तीची चर्चा का?'

'धोनीमध्ये अद्याप बरीच क्षमता, मग निवृत्तीची चर्चा का?'

बॉलिवडूमधील आणखी एका व्यक्तीने धोनीच्या निवृत्तासंदर्भात वक्तव्य केले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 जुलै: ICC world cupमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनल सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघ स्पर्धेबाहेर झाला. भारत वर्ल्ड कपचा मुख्य दावेदार होता. त्यामुळे भारताच्या पराभवाने अनेकांना धक्का बसला. भारतीय चाहते नाराज झाले असले तरी खेळाडूंच्या कामगिरीचे सर्वांनी कौतुकत केले. असे असले तरी सेमीफायनलनंतर महेंद्र सिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली. यासंदर्भात केवळ क्रिकेटपटू नाही तर अन्य क्षेत्रातील व्यक्तींनी आपली मते व्यक्त केली आहेत. काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांनी धोनीच्या निवृत्तीसंदर्भात ट्विटवरून त्यांचे मत मांडले होते. आता बॉलिवडूमधील आणखी एका व्यक्तीने धोनीच्या निवृत्तासंदर्भात वक्तव्य केले आहे.

अनेकांच्या मते वर्ल्ड कपनंतर निवृत्त होणार होता. त्यामुळेच विजेतेपद मिळवल्यानंतर धोनी पुन्हा मैदानात दिसणार नाही अशी चर्चा स्पर्धेपूर्वीच सुरु झाली होती. आता सेमीफायनलमधील पराभवानंतर चाहत्यांना हा प्रश्न पडला आहे की ते धोनीला पुन्हा मैदानात पाहतील की नाही. धोनीने निवृत्ती घेऊ नये अशी विनंती चाहते करत आहेत. काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांनी देशाला तुझी गरज आहे त्यामुळे निवृत्ती घेऊ नकोस, असे त्या म्हणाल्या होत्या. आता लतादिदींच्या पाठोपाठ जावेद अख्तर यांनी देखील ट्विटकरून धोनीच्या निवृत्तीसंदर्भात स्वत:चे मत मांडले आहे.

मधल्या फळीतील फलंदाज, विकेटकीपर म्हणून धोनीवर विश्वास ठेऊ शकतो. धोनीवर अवलंबून राहता येते. विराटने देखील मान्य केली आहे की मैदानात रणनिती ठरवताना धोनीचा उपयोग होतो. आपण सर्व जण पाहतोय की धोनीमध्ये अजून क्षमता आहे. असे असताना त्याच्या निवृत्तीबद्दल चर्चा का केली जात आहे?, असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले आहे.

जिंकेल तो इतिहास घडवणार; क्रिकेटमध्ये 29 वर्षांतर होत आहे अशी फायनल!

काय म्हणाल्या होत्या लता मंगेशकर...

'नमस्कार एम एस धोनीजी, तुम्ही क्रिकेटमधून निवृत होणार आहात असं मी मागच्या काही दिवसांपासून ऐकत आहे. कृपया तुम्ही असा विचार करू नका. देशाला तुमच्या खेळाची गरज आहे आणि मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही निवत्तीचा विचारही मनात आणू नका.’

VIDEO: पत्नीने गर्लफ्रेंडसोबत पाहिलं पतीला, बेडरूममध्ये केली बेदम धुलाई!

First published: July 14, 2019, 11:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading