पंतमुळे धोनीच्या निवृत्तीला होतोय उशीर, वाचा INSIDE STORY

धोनी वर्ल्ड कपनंतर मैदानाबाहेर आहे आणि बीसीसीआयने पंतला यष्टीरक्षक म्हणून प्राधान्य देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. असे असताना धोनी निवृत्ती का जाहीर करत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2019 01:49 PM IST

पंतमुळे धोनीच्या निवृत्तीला होतोय उशीर, वाचा INSIDE STORY

नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आहे. विंडीज, दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर आता नोव्हेंबर पर्यंत क्रिकेट खेळणार नसल्याचं धोनीनं निवड समितीला सांगितलं आहे. त्याच्या या निर्णयानंतर पुन्हा एकदा निवृत्तीच्या चर्चेला उत आला आहे. दरम्यान, धोनीच्या जागी खेळण्यासाठी निवड समितीने युवा खेळाडू ऋषभ पंतवर विश्वास दाखवला आहे. यष्टीरक्षणात चांगली कामगिरी करणाऱ्या पंतला अद्याप फलंदाजीत मात्र सूर गवसलेला नाही. यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

धोनीच्या निवृत्तीला विलंब होण्यामागे पंत कारण असल्याचं समोर येत आहे. याआधीही अशीच चर्चा होती की, आपला वारसदार पंतला योग्य मार्गदर्शन करून त्याला घडवल्यानंतरच धोनी निवृत्ती घेईल. या कारणामुळेच आतापर्यंत धोनीने निवृत्ती घेतलेली नाही.

वर्ल्ड कपमधील पराभवानंतर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. याबद्दल आता डीएनएच्या वृत्तानुसार धोनी इंग्लडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपनंतर लगेच निवृत्ती घेणार होता असं म्हटलं जात होतं. पण त्यानं हा निर्णय घेतला नाही. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी पंतला तयार करण्यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी त्याने निवृत्तीचा विचार थांबवला. धोनीला वाटतं की, सगळी जबाबदारी पंतवर येईल. त्याच्यासाठी पर्याय तयार व्हावा आणि पंत पूर्ण तयार होईपर्यंत निवृत्ती पुढे ढकलली. दरम्यान, निवड समितीदेखील पंतला बॅकअप म्हणून इतर खेळाडूंना तयार करत असल्याचं म्हटलं आहे.

धोनीने विंडीजपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतूनही माघार घेतली. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचं बीसीसआयला कळवलं आहे. त्यामुळे आता धोनी थेट डिसेंबरमध्येच मैदानावर दिसेल. डिसेंबरमध्ये विंडीजविरुद्ध मालिका होणार आहे. मात्र याबाबत अद्याप काहीच सांगण्यात आलेलं नाही.

VIDEO: पवारांवरील कारवाईनंतर बारामीतकरांमध्ये रोष, रस्त्यावर उतरून केली निदर्शनं

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: MS Dhoni
First Published: Sep 25, 2019 01:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...