• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • ...म्हणून धोनीला मिळाली नाही फेयरवेल मॅच, इथे झाली गडबड!

...म्हणून धोनीला मिळाली नाही फेयरवेल मॅच, इथे झाली गडबड!

टीम इंडियाचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) एका वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 15 ऑगस्ट 2020 साली धोनीने ट्वीट करत आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याचं सांगितलं.

 • Share this:
  मुंबई, 29 जून : टीम इंडियाचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) एका वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 15 ऑगस्ट 2020 साली धोनीने ट्वीट करत आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याचं सांगितलं. 2019 साली न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळली नव्हती. त्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता, म्हणून धोनीचा शेवट गोड व्हावा, अशी इच्छा त्याच्या अनेक चाहत्यांनी बोलून दाखवली. धोनीसारख्या महान खेळाडूला फेयरवेल मॅच का देण्यात आली नाही? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता. आता 10 महिन्यांनंतर याबाबतचं उत्तर मिळालं आहे. भारताचे माजी निवड समिती सदस्य सरनदीप सिंग (Sarandeep Singh) यांनी न्यूज नेशनसोबत बोलताना धोनीला फेयरेवल मॅच का मिळाली नाही, याबाबतचा खुलासा केला आहे. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्ड कप कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आला, म्हणून त्याला फेयरवेल मॅच मिळाली नाही, असं सरनदीप सिंग म्हणाले. धोनीने 2014 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, यामुळे अनेकांना धक्का बसला. यानंतर धोनीने 15 ऑगस्ट 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचंही अचानकच सांगितलं. एमएस धोनी हा भारताचा आतापर्यंतचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने 2007 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकला, तसंच 2011 साली 50 ओव्हरच्या वर्ल्ड कपमध्येही भारताचा विजय झाला. 2013 सालची चॅम्पियन्स ट्रॉफीही भारताने धोनीच्या नेतृत्वात जिंकली. आयसीसीच्या या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे.
  Published by:Shreyas
  First published: