...म्हणून ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या नटराजनसोबत BCCI ने करार केला नाही

...म्हणून ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या नटराजनसोबत BCCI ने करार केला नाही

बीसीसीआयने (BCCI) गुरूवारी खेळाडूंसोबतच्या वार्षिक कराराची घोषणा केली, पण या यादीमध्ये टी. नटराजन (T. Natrajan) याचं नाव नसल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल : बीसीसीआयने (BCCI) गुरूवारी खेळाडूंसोबतच्या वार्षिक कराराची घोषणा केली. बीसीसीआयच्या या करारात एकूण 28 खेळाडूंची 4 ग्रेडमध्ये विभागणी करण्यात आली आहे. A प्लस ग्रेडमधील खेळाडूंना 7 कोटी रुपये, A ग्रेडमधील खेळाडूंना 5 कोटी रुपये, ग्रेड B मधील खेळाडूंना 3 कोटी, तर C ग्रेडमधील खेळाडूंना वर्षभरासाठी प्रत्येकी 1 कोटी रुपये मिळणार आहेत.

मागच्यावेळप्रमाणेच यंदाही A प्लस ग्रेडमध्ये विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या तीन खेळाडूंचाच समावेश आहे. तर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांचं डिमोशन झालं आहे. मनीष पांडे (Manish Pandey), केदार जाधव (Kedar Jadhav), पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि टी. नटराजन (T.Natrajan) यांच्यासोबत बीसीसीआयने करारच केला नाही.

मनिष पांडे, केदार जाधव आणि पृथ्वी शॉ यांना गेल्या काही काळात फॉर्मसाठी संघर्ष करावा लागला आहे. मनिष पांडे भारताच्या टी-20 टीमचाच भाग असला तरी त्याला अंतिम-11 मध्ये खेळायची फार संधी मिळाली नाही, तर दुसरीकडे केदार जाधवही 2019 वर्ल्ड कपनंतर टीममधून बाहेर आहे. पण ऑस्ट्रेलिया दौरा गाजवलेल्या टी नटराजन याला बीसीसीआयने करारबद्ध केलं नाही, त्यामुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

BCCI नं हार्दिक पांड्याच्या पगारात केली 2 कोटींची वाढ, वाचा रोहित आणि विराटला किती मिळणार पैसे?

बीसीसीआयचा नियम

बीसीसीआयच्या नियमानुसार एखाद्या खेळाडूला करारबद्ध करण्यासाठी त्याने मागच्या मोसमात कमीत कमी 3 टेस्ट किंवा 8 वनडे किंवा 10 टी-20 खेळणं बंधनकारक आहे. टी. नटराजन याने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एवढ्या टेस्ट किंवा वनडे खेळलेल्या नाहीत, त्यामुळे त्याच्यासोबत बीसीसीआयने करार केला नाही.

आयपीएलच्या मागच्या मोसमात टी.नटराजन याने उल्लेखनीय कामगिरी केली. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याला दुखापत झाल्यामुळे अखेरच्या क्षणी टी.नटराजन याची भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली. या मोसमात नटराजन 1 टेस्ट, 2 वनडे आणि 4 टी-20 खेळला. बीसीसीआयच्या नियमांमध्ये बसत नसल्यामुळे नटराजनसोबत करार करण्यात आला नाही. पृथ्वी शॉ, मनिष पांडे आणि केदार जाधव यांनाही याच नियमामुळे करारबद्ध करण्यात आलं नाही. पृथ्वी शॉ मागच्या मोसमात फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली टेस्ट खेळला होता.

Published by: Shreyas
First published: April 16, 2021, 4:12 PM IST

ताज्या बातम्या