Home /News /sport /

'निवड समिती'साठी अजित आगरकरचा पत्ता कट का झाला? जाणून घ्या कारण

'निवड समिती'साठी अजित आगरकरचा पत्ता कट का झाला? जाणून घ्या कारण

जगातलं सगळ्यात श्रीमंत बोर्ड असणाऱ्या बीसीसीआय (BCCI) ने गुरूवारी टीम इंडियाच्या तीन नव्या निवड समिती सदस्यांची घोषणा केली. बीसीसीआयच्या या घोषणेनंतर अनेकांना धक्का बसला, कारण या यादीमध्ये अजित आगरकर (Ajit Agarkar) याचं नाव नव्हतं.

पुढे वाचा ...
    मुंबई, 25 डिसेंबर : जगातलं सगळ्यात श्रीमंत बोर्ड असणाऱ्या बीसीसीआय (BCCI) ने गुरूवारी टीम इंडियाच्या तीन नव्या निवड समिती सदस्यांची घोषणा केली. बीसीसीआयच्या या घोषणेनंतर अनेकांना धक्का बसला, कारण या यादीमध्ये अजित आगरकर (Ajit Agarkar) याचं नाव नव्हतं. बीसीसीआयने चेतन शर्मा (Chetan Sharma), देवाशिष मोहंती (Debashish Mohanty) आणि ऍबी कुरुविला (Abey Kurivilla) यांच्या नावाची निवड केली. वरिष्ठ असल्यामुळे चेतन शर्मा निवड समिती अध्यक्ष झाले. अजित आगरकरचा अनुभव बघता तो निवड समिती अध्यक्ष होईल, असं सांगितलं जात होतं. आगरकरने भारतासाठी 191 वनडे आणि 26 टेस्ट खेळल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित आगरकर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या राजकारणाचा बळी ठरला. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार क्रिकेट सल्लागार समिती (CAC) च्या बैठकीत अजित आगरकर आणि ऍबी कुरुविला यांच्या नावावर बराच वेळ चर्चा झाली. आगरकर हा एकमेव खेळाडू होता, ज्याच्याकडे 200 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्याचा अनुभव आहे. पण बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, 'अजित आगरकरला मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) कडून समर्थन कधीच मिळालं नव्हतं. मुंबई टीमचा निवड समिती अध्यक्ष म्हणून आगरकरने मॅच बघितल्या नव्हत्या. तसंच ऍबी कुरुविला याला मुंबईतल्या क्रिकेट जगतातल्या प्रभावी लोकांचं समर्थन होतं. अजित आगरकर त्याच्या क्रिकेट रेकॉर्डनेही ऍबी कुरुविला याला मागे टाकू शकत नव्हता.' चेतन शर्मा निवड समिती प्रमुख बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने गुरूवारी माजी भारतीय फास्ट बॉलर चेतन शर्मा यांची निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती केली. क्रिकेट सल्लागार समितीने पाच सदस्यीय टीममध्ये मुंबईचा ऍबी कुरुविला आणि ओडिसाच्या देबाशिष मोहंती याचीही निवड केली. चेतन शर्माने उत्तर विभागातल्या मनिंदर सिंग आणि विजय दहिया यांना मागे टाकलं. देबाशिष मोहंती मागच्या दोन वर्षांपासून ज्युनियर टीमच्या निवड समितीमध्ये होता. पुढची दोन वर्ष तो निवड समितीमध्ये राहू शकतो. या निवड समितीमध्ये सुनिल जोशी (दक्षिण विभाग) आणि हरविंदर सिंग (मध्य विभाग) हे आधीपासूनच आहेत. निवड समितीमधला सर्वाधिक टेस्ट मॅच खेळणारा खेळाडू निवड समितीचा अध्यक्ष बनतो. चेतन शर्मा यांनी 11 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये 23 टेस्ट आणि 65 वनडे खेळल्या. 1987 वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक घेण्याचा विक्रमही चेतन चौहान यांच्या नावावर आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या