मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

रहाणे-पुजाराला टीमबाहेर का केलं? अखेर रवी शास्त्रींनी दिलं स्पष्टीकरण

रहाणे-पुजाराला टीमबाहेर का केलं? अखेर रवी शास्त्रींनी दिलं स्पष्टीकरण

गेल्या वर्षभरापासून संघर्ष करणाऱ्या अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) भारतीय टेस्ट टीमच्या (Team India) उपकर्णधारपदावरून हटवण्यात आलं आहे. तर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याचंही टीममधलं स्थान धोक्यात आलं आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 10 डिसेंबर : गेल्या वर्षभरापासून संघर्ष करणाऱ्या अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) भारतीय टेस्ट टीमच्या (Team India) उपकर्णधारपदावरून हटवण्यात आलं आहे. रहाणेऐवजी रोहित शर्माची (Rohit Sharma) टेस्ट टीमचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर आता अजिंक्य रहाणेच्या टीममधल्या स्थानावरही संकट ओढावलं आहे. याआधी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातच 2017 साली केप टाऊन टेस्टमध्ये रहाणेला टीमबाहेर ठेवण्यात आलं होतं. टीम इंडियाचे तेव्हाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये रवी शास्त्रींनी यावर प्रतिक्रिया दिली.

'रोहित आणि रहाणेमध्ये कायमच तुलना झाली आहे. 2017 साली केप टाऊन टेस्टमध्येही असंच पाहायला मिळालं होतं. दोघांनाही टीममध्ये संधी देणं शक्य नव्हतं. रोहित शर्मा तेव्हा चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि रनही करत होता. त्याच्यामध्ये रन काढण्याची भूक होती, हे आम्ही बघितलं. टेस्ट टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी तो खूप मेहनत करत होता, त्यामुळे आम्ही चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूसोबत जाण्याचा निर्णय घेतला,' असं वक्तव्य रवी शास्त्रींनी केलं.

2018 साली इंग्लंडविरुद्धच्या एजबेस्टन टेस्टमध्ये चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) बाहेर करण्यात आलं होतं, तेव्हाही मोठा वाद निर्माण झाला होता आणि टीम निवडीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, त्यावरही शास्त्रींनी भाष्य केलं. 'आम्ही पुजाराला याबाबत आधीच सांगितलं होतं. तो फॉर्ममध्ये नव्हता आणि कोणत्या कारणामुळे त्याला टीमबाहेर ठेवण्यात आलं, हेदेखील त्याला सांगण्यात आलं होतं. मी स्वत: पुजारासोबत बोललो होतो,' असं शास्त्री म्हणाले.

'पुजाराला बाहेर करणं त्याच्यासाठी चांगलंच झालं. जेव्हा त्याने टीममध्ये पुनरागमन केलं, तेव्हा त्याच्यामध्ये रन करण्याची भूक दिसली. यानंतर त्याने चांगली कामगिरी केली,' असं शास्त्रींनी सांगितलं. 2018 साली पुजाराने साऊथम्पटन टेस्टमध्ये 132 रनची नाबाद खेळी केली. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एडलेड, मेलबर्न आणि सिडनीमध्येही शतकं केली.

First published:

Tags: Ajinkya rahane, Pujara, Ravi shastri, Team india