VIDEO : 'जल्लोष करायचा पण चेन्नईविरुद्ध नाही', पाहा राशिद-ताहिरची जुगलबंदी

VIDEO : 'जल्लोष करायचा पण चेन्नईविरुद्ध नाही', पाहा राशिद-ताहिरची जुगलबंदी

सामन्यातनंतर चेन्नईचा फिरकीपटू इम्रान ताहीरने हैदराबादच्या राशिद खानची मुलाखत घेतली.

  • Share this:

हैदराबाद, 18 एप्रिल : आयपीएलच्या 12 व्या हंगामात हैदराबादने चेन्नईला 6 गडी राखून पराभूत केलं. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत उतरलेल्या चेन्नईला 132 धावा करता आल्या. चेन्नईने दिलेले आव्हान हैदराने 18 व्या षटकात पूर्ण केले. या सामन्यातनंतर चेन्नईचा फिरकीपटू इम्रान ताहीरने हैदराबादच्या राशिद खानची मुलाखत घेतली. यावेळी दोघांनीही एकमेकांना प्रश्न विचारले.

राशिद खान विकेट घेतल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे जल्लोष करतो मात्र या सामन्यात तो दिसला नाही याबद्दल ताहीरने विचारले. त्यावर राशिद खान म्हणाला की, बोल्ड किंवा झेलबाद झाल्यावर मी जल्लोष करतो. पण रैना बाद झाला तेव्हा रिव्ह्यू घ्यावा लागला होता. त्यामुळे जल्लोष केला नाही.

राशिदच्या उत्तरावर ताहीरने फिरकी घेत जल्लोष करायचा पण चेन्नईविरुद्ध नाही असं म्हटलं. त्यावर राशिदनेही प्रश्न विचारला की, तुझ्या जल्लोषाने सगळ्या संघात उत्साह संचारतो यामागे कारण काय आहे? ताहीर म्हणाला की, आनंदाच्या भरात मी काय करतो ते मलाच कळत नाही. ताहीरने या सामन्यातन 4 षटकांत 20 धावा देत 2 बळी घेतले.

...तर पंत, रायडु आणि सैनीला वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी

राशिदने एक किस्सा सांगताना म्हटले की, एका अफगाणिस्तानच्या चाहत्याने तू कधी ताहिरला बाद करू नको असं सुचवलं होतं. त्याबद्दल विचारले असता चाहत्यानं सांगितलं की, ताहीर फक्त तुला बाद करणार नाही तर घरापर्यंत पळवून लावेल.

यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात जास्त चर्चा झालेल्या गोष्टींमध्ये राशिद आणि इम्रान ताहिर यांच्यात चांगला फिरकीपटू कोण याचा क्रमांक वरचा आहे. सध्या तरी ताहिर विकेट घेण्याच्या बाबतीत राशिदपेक्षा आघाडीवर आहे.

SPECIAL REPORT : 'लाव रे तो व्हिडिओ'

First published: April 18, 2019, 1:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading