कोण होणार महाराष्ट्र केसरी ? उद्या सातारकर विरुद्ध पुणेकर !

कोण होणार महाराष्ट्र केसरी ? उद्या सातारकर विरुद्ध पुणेकर !

42 व्या महाराष्ट्र केसरी कुस्तीची अंतिम फेरी पुण्याचा मल्ल अभिजीत कटके आणि साताऱ्याच्या पैलवान किरण भगत यांच्यात होणार आहे.

  • Share this:

23 डिसेंबर : भुगाव येथे सुरू असलेल्या 42 व्या महाराष्ट्र केसरी कुस्तीची अंतिम फेरी पुण्याचा मल्ल अभिजीत कटके आणि साताऱ्याच्या पैलवान  किरण भगत यांच्यात होणार आहे.

अभिजीतने आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यावर चढाई करत  गादीवर गुणांवरती कुस्त्या जिंकल्या आहेत.

तर किरण भगतने मातीवर प्रतिस्पर्ध्याला चीतपट करत कुस्त्या जिंकल्या आहेत. अभिजीत गेल्या वर्षीही अंतिम फेरीत लढला होता पण विजय चौधरीने चुरशीची लढत जिंकली होती.

यंदा अभिजीतने चंद्रहार पाटीलला हरवणारा गणेश जगताप, बीडचा अक्षय शिंदे यांना अस्मान दाखवलंय.

अभिजीतला घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा मिळतोय. गेल्या वर्षीही अंतिम लढतीत खेळण्याची मिळालेली संधी या गोष्टी फायद्याच्या ठरणार आहेत तर किरणनेही तुफानी कुस्ती करत बाला रफिक शेख सारख्या तगड्या पैलवनाला चीतपट केल्यानं त्याचा आत्मविश्वास दुणावलाय.

त्यामुळे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी या राजकीय दृष्ट्या हेवी वेट पुढाऱ्यांच्या उपस्थितीत आणि 50 हजार प्रेक्षकांच्या हजेरीत यंदाची महाराष्ट्र केसरीची गदा कोण पटकावणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनाचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2017 09:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading