मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

विराटनंतर कोण होणार भारताच्या टेस्ट टीमचा कॅप्टन? गांगुलीने दिली हिंट!

विराटनंतर कोण होणार भारताच्या टेस्ट टीमचा कॅप्टन? गांगुलीने दिली हिंट!

sourav ganguly

sourav ganguly

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच त्याने विराटनंतर (Virat Kohli) टेस्ट टीमचा कर्णधार (Test Team Captain) कोण असेल, याबाबतही संकेत दिले आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 4 फेब्रुवारी : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. बीसीसीआय अध्यक्ष म्हणून गेल्या काही दिवसांमध्ये गंभीर आरोप झाले. गांगुलीने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. गांगुलीने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक संवेदनशील मुद्द्यांवर भाष्य केलं, तसंच त्याने विराटनंतर (Virat Kohli) टेस्ट टीमचा कर्णधार (Test Team Captain) कोण असेल, याबाबतही संकेत दिले आहेत. गांगुलीने विराटच्या कॅप्टन्सीवरून झालेल्या वादावर बोलणं मात्र टाळलं आहे. विराटने मागच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सीरिज 2-1 ने गमावल्यानंतर टेस्ट टीमची कॅप्टन्सी सोडली.

विराट कोहलीने टेस्ट टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर नवा कर्णधार कोण असेल असं गांगुलीला विचारण्यात आलं. 'आम्ही कर्णधारपदासाठी काही मापदंड ठेवले आहेत. जो यात फिट बसेल, तो भारतीय टेस्ट टीमचा पुढचा कर्णधार असेल. निवड समितीच्या डोक्यात एक नाव असेल, ते बीसीसीआय अधिकारी, अध्यक्ष आणि सचिव यांच्यासोबत चर्चा करतील आणि मग कॅप्टनची घोषणा केली जाईल,' असं गांगुली म्हणाला.

बीसीसीआय पुढच्या महिन्यात कोहलीच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा करू शकतात. वनडे आणि टी-20 फॉरमॅटसाठी आधीच रोहित शर्माची (Rohit Sharma) कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे रोहितच टेस्ट टीमचाही कर्णधार असेल, अशी शक्यता आहे. पण काही दिग्गजांच्या मते केएल राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यरदेखील या रेसमध्ये आहेत.

टीम निवडीच्या बैठकींमध्ये सामील होत असल्याच्या आरोपांवर सौरव गांगुलीने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष होण्याआधी आपण 424 आंतरराष्ट्रीय मॅच खेळलो आहोत, अशी आठवण गांगुलीने करून दिली आहे.

'मला वाटत नाही, यावर उत्तर द्यायची गरज आहे. कोणताही आधार नसलेल्या या आरोपांना महत्त्व द्यायची गरज नाही. मी बीसीसीआय अध्यक्ष आहे आणि अध्यक्षाला जे काम करायचं आहे, ते मी करतो. सोशल मीडियावर एक फोटो फिरत आहे. हा फोटो निवड समितीच्या बैठकीतला नव्हता. जयेश जॉर्ज निवड समितीचा भाग नाही. मी भारतासाठी 424 आंतरराष्ट्रीय मॅच खेळलो आहे. कधी कधी लोकांना याची आठवण करून देणं चुकीचं नाही,' अशी प्रतिक्रिया सौरव गांगुलीने दिली.

First published:

Tags: BCCI, Sourav ganguly, Team india, Virat kohli