• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • विराटनंतर डिव्हिलियर्सनेही सोडली RCB ची साथ, आता संघाचा वाली कोण?

विराटनंतर डिव्हिलियर्सनेही सोडली RCB ची साथ, आता संघाचा वाली कोण?

ab de villiers with virat kohli

ab de villiers with virat kohli

आज डिव्हिलियर्स (AB de Villiers) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. त्यामुळे, आता आरसीबी संघाचा वाली कोण? या चर्चेने क्रिकेट जगतात जोर धरला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: विराट कोहली (Virat Kohli) टी- 20 (T-20) फॉरमॅटसह आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमच्या कॅप्टनपदावरुनही पायउतार झाला आहे. त्यानंतर आरसीबीच्या कर्णधारपदाची धूरा कोण सांभळणार याची चर्चा सुरु होती. आरसीबीचा महत्त्वाचा खेळाडू अशातच एबी डिव्हिलियर्सचे (AB de Villiers ) नाव अग्रस्थानी होते. मात्र, ही आशादेखील आता मावळली आहे. कारण आज डिव्हिलियर्स सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. त्यामुळे, आता संघाचा वाली कोण? या चर्चेने क्रिकेट जगतात जोर धरला आहे. कर्णधार म्हणून विराटने यंदाची आयपीएल शेवटची खेळला होता. तर आपल्या कारकर्दितील अखेरची आयपीएल डिव्हिलियर्स खेळली. डिव्हिलियर्स हा आरसीबीचा सर्वात मोठा सामना विजेता होता. त्याच्या अचानक निवृत्ती घोषणे नंतर आगामी आयपीएल स्पर्धेत आरसीबी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार? असा सवाल उपस्थित होत आहे. तर या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेलचे नाव अग्रस्थानी आहे. या हंगामात मॅक्सवेलने आपली उत्कृष्ट खेळी दाखवली. विराट आणि डिव्हिलियर्सनंतर तो संघाचा सर्वात महत्त्वाचा फलंदाज मानला जातो. डिव्हिलियर्सच्या जाण्यानंतर आरसीबी त्याला कायम ठेवू इच्छितो आणि तो कर्णधार झाला तर नवल वाटण्यासारखी गोष्ट नाही. अशी चर्चा क्रिकेट जगतात सुरु आहे. तसेच, आयपीएल-2021 मध्ये पंजाब किंग्जचे कर्णधार असलेल्या केएल राहुलबद्दल बातम्या येत होत्या की तो पंजाब सोडू शकतो. असे झाल्यास आरसीबी पुढील हंगामासाठी मेगा लिलावात त्याच्यावर पैसे लावू शकते आणि त्याला कर्णधार बनवू शकते. राहुल आरसीबीकडूनच पंजाबला गेला. डेव्हिड वॉर्नर, ज्याने 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादचे आयपीएल विजेतेपद मिळवले, हे आणखी एक नाव आहे ज्यावर आरसीबीच्या नजरा वळल्या आहेत. हैदराबादने वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकले होते आणि त्यानंतर प्लेइंग 11 मध्ये त्याला संधीही दिली नव्हती.आपले नाव लिलावात ठेवणार असल्याचे वॉर्नरने स्पष्ट केले होते. वॉर्नर प्रभावी कर्णधार आणि फलंदाज असल्याचे सिद्ध झाले आहे.आरसीबी त्याला सोबत घेऊ शकते. वॉर्नरसह ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचचेही नाव चर्चेत आहे. तो 2020 मध्ये आरसीबीकडून खेळला आहे. मात्र, 2021 मध्ये त्याला विकत घेता आले नाही. आता आरसीबीला एका कर्णधाराची गरज आहे, जो आपल्या बॅटने चमत्कार करू शकेल, तर फिंच हा पर्याय असू शकतो.
  Published by:Dhanshri Otari
  First published: