Home /News /sport /

रवी शास्त्रींनंतर हे 5 दिग्गज टीम इंडियाचे प्रशिक्षक व्हायच्या रेसमध्ये

रवी शास्त्रींनंतर हे 5 दिग्गज टीम इंडियाचे प्रशिक्षक व्हायच्या रेसमध्ये

रवी शास्त्री (Ravi Shastri) प्रशिक्षक असताना टीम इंडियाला (Team India) अजूनपर्यंत आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही, पण मोठ्या स्पर्धांमध्ये टीमची कागमिरी चांगली झाली. रवी शास्त्रींचा कार्यकाळ ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) संपणार आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 5 जुलै: रवी शास्त्री (Ravi Shastri) प्रशिक्षक असताना टीम इंडियाला (Team India) अजूनपर्यंत आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही, पण मोठ्या स्पर्धांमध्ये टीमची कागमिरी चांगली झाली. रवी शास्त्रींचा कार्यकाळ ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) संपणार आहे, त्यामुळे त्यांच्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीला टीम इंडियाचा कोच बनवलं जाऊ शकतं. शास्त्री प्रशिक्षक असताना भारताने दोन वेळा ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकली, तसंच टीमला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्येही पोहोचता आलं. आता टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी 5 नावांमध्ये स्पर्धा आहे. राहुल द्रविड : श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आहे. भारताची एक टीम इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे श्रीलंकेमध्ये नवोदितांना संधी देण्यात आली आहे. यातल्या बऱ्याच खेळाडूंना द्रविडने आधीही प्रशिक्षण दिलं आहे. 2015 साली द्रविड टीम इंडियाच्या अंडर-19 टीमचा प्रशिक्षक होता, यानंतर त्याने इंडिया-एची जबाबदारी घेतली. 2016 साली भारत अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये उपविजेता राहिला, तर 2018 वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय झाला. द्रविडच्या मार्गदर्शनानंतर पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, मयंक अग्रवाल आणि इशान किशन या खेळाडूंची टीम इंडियात निवड झाली. माईक हेसन : न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन (Mike Hesson) सध्या आयपीएलमध्ये (IPL) आरसीबीचे (RCB) डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स आहेत. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि हेसन यांच्यात चांगले संबंध आहेत. 2012 साली माईक हेसन न्यूझीलंडचे कोच झाले, यानंतर 2015 वर्ल्ड कप फायनलमध्ये न्यूझीलंड पोहोचली. हेसन यांच्या न्यूझीलंडसोबतचा कार्यकाळ 2019 वर्ल्ड कपपर्यंत होता, पण जून 2018 साली त्यांनी पदाचा राजीनामा दिला. न्यूझीलंडच्या इतिहासातले ते सगळ्यात यशस्वी प्रशिक्षकांपैकी एक आहेत. वीरेंद्र सेहवाग : सेहवागने (Virender Sehwag) याआधीही टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज केला होता, पण तेव्हा रवी शास्त्रींच्या गळ्यात प्रशिक्षकपदाची माळ पडली. सेहवाग आपल्या स्पष्ट वक्तेपणाबाबत ओळखला जातो, पण त्याच्याकडे कोचिंगचा अनुभव नाही, ही बाजू त्याच्या विरोधात जाऊ शकते. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीसोबत सेहवागचे संबंध चांगले आहेत, त्यामुळे त्याचा या पदासाठी विचार केला जाऊ शकतो. टॉम मुडी : ऑस्ट्रेलियाचे माजी ऑलराऊंडर टॉम मुडी (Tom Moody) यांना कोचिंगचा चांगला अनुभव आहे. ते सध्या आयपीएलमध्ये हैदराबाद टीमचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट आहेत. 2005 पासून मुडी वेगवेगळ्या टीमना प्रशिक्षण देत आहेत. श्रीलंकेशिवाय त्यांनी आयपीएल, सीपीएल, बिग बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीगमध्ये कोचिंग केलं आहे. रवी शास्त्री : याशिवाय खुद्द रवी शास्त्रीही दुसऱ्यांदा कोच बनण्याच्या रेसमध्ये असतील. जरी भारताला शास्त्री कोच असताना एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही, पण टीम टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली. तसंच भारताला वर्ल्ड कपची सेमी फायनल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल गाठता आली. जर टीमला टी-20 वर्ल्ड कप जिंकता आला, तर तेच टीमचे प्रशिक्षक म्हणून कायम राहतील.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Ravi shastri, Team india

    पुढील बातम्या