मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : रोहित फिट झाला नाही तर कोण होणार वनडेचा कॅप्टन? या तिघांमध्ये रेस!

IND vs SA : रोहित फिट झाला नाही तर कोण होणार वनडेचा कॅप्टन? या तिघांमध्ये रेस!

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्याआधीच (India tour of South Africa) टीम इंडियाला मोठा धक्का बसला. मुंबईमध्ये सराव करत असताना रोहित शर्माच्या (Rohit Sharma Injured) मांडीच्या स्नायूला दुखापत झाली, त्यामुळे तो तीन टेस्ट मॅचच्या सीरिजमधून बाहेर झाला.

पुढे वाचा ...

मुंबई, 15 डिसेंबर : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्याआधीच (India tour of South Africa) टीम इंडियाला मोठा धक्का बसला. मुंबईमध्ये सराव करत असताना रोहित शर्माच्या (Rohit Sharma Injured) मांडीच्या स्नायूला दुखापत झाली, त्यामुळे तो तीन टेस्ट मॅचच्या सीरिजमधून बाहेर झाला. तसंच तो वनडे सीरिजसाठीही फिट होईल का नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. याच दौऱ्यापासून रोहित टेस्ट टीमचा उपकर्णधार आणि वनडे टीमचा कर्णधार होणार होता. पण आता वनडे सीरिजसाठी रोहित फिट झाला नाही, तर बीसीसीआयला या सीरिजसाठी नवा कर्णधार शोधावा लागेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी अजूनही टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही.

रोहित शर्मा जर वनडेसाठी फिट होऊ शकला नाही तर बीसीसीआयपुढे (BCCI) कर्णधार म्हणून तीन पर्याय उपलब्ध आहेत. यातलं पहिलं नाव केएल राहुलचं (KL Rahul) आहे. राहुलने आतापर्यंत आयपीएलच्या (IPL) तीन मोसमांमध्ये पंजाबचं (Punjab Kings) नेतृत्व केलं आहे. तसंच आयपीएलच्या मागच्या दोन्ही मोसमांमध्ये राहुलने 600 पेक्षा जास्त रन केल्या आहेत. तसंच राहुल 2020 साली सगळ्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. राहुलचा हा फॉर्म बघता तो कर्णधार व्हायच्या रेसमध्ये सगळ्यात पुढे आहे.

कर्णधार म्हणून टीम इंडियाकडे श्रेयस अय्यरचाही (Shreyas Iyer) पर्याय उपलब्ध आहे. 2021 हे वर्ष अय्यरसाठी निराशाजनक राहिलं. वर्षाच्या सुरुवातीलाच अय्यरला दुखापत झाल्यामुळे तो आयपीएलचा पहिला राऊंड खेळू शकला नाही, या दुखापतीमुळे त्याला आयपीएलची दिल्लीची (Delhi Capitals) कॅप्टन्सीही गमवावी लागली. वर्षाच्या अखेरीस मात्र अय्यरने धमाका केला. आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये त्याने शतक आणि अर्धशतक केलं. पदार्पणाच्या टेस्टमध्येच अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. राहुलप्रमाणेच अय्यरलाही आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याचा अनुभव आहे.

या यादीमध्ये तिसरं नाव जसप्रीत बुमराहचं (Jasprit Bumrah) आहे. दक्षिण आफ्रिकेतलं बुमराहचं रेकॉर्ड उल्लेखनीय आहे, तसंच त्याच्याकडे कर्णधारपदाचा अनुभव नसला तरी मॅचचा बऱ्यापैकी अनुभव आहे.

First published: