• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Biopic मध्ये हे अभिनेते असतील Pandya Brothers, कृणालने सांगितली नावं

Biopic मध्ये हे अभिनेते असतील Pandya Brothers, कृणालने सांगितली नावं

पांड्या बंधूंच्या (Pandya Brothers) बायोपिकबाबत कृणाल पांड्याला (Krunal Pandya) त्याच्या आणि हार्दिकबाबत (Hardik Pandya) प्रश्न विचारण्यात आला.

 • Share this:
  मुंबई, 23 सप्टेंबर : क्रिकेटपटूंचा बायोपिक सध्या ट्रेण्डमध्ये आहे. एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर यांच्यानंतर सौरव गांगुली, मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांचा बायोपिक लवकरच येणार आहे. बायोपिकबाबत कृणाल पांड्याला (Krunal Pandya) त्याच्या आणि हार्दिकबाबत (Hardik Pandya) प्रश्न विचारण्यात आला. तुमच्या दोघांवर बायोपिक आला तर कोणत्या अभिनेत्यांनी भूमिका साकारावी? असं कृणालला विचारण्यात आलं. कृणालने या प्रश्नावर बराच विचार केला आणि विकी कौशल (Vicky Kaushal), रणवीर सिंग (Ranveer Singh) या दोघांची नावं घेतली. विकी कौशल माझी भूमिका करू शकतो आणि हार्दिक पांड्याच्या रोलसाठी रणवीर सिंगला पसंती देईन, असं कृणाल म्हणाला. 6 बॉलवर 6 सिक्स मारण्याचं स्वप्न आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 बॉलला 6 सिक्स मारणं हा आजही सगळ्यात मोठा विक्रम मानला जातो. अमेरिकेच्या जसकरण मल्होत्राने नुकताच हा रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला. ओमानमध्ये पपुआ न्यू गिनीविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये या विकेट कीपर बॅट्समनने सहा बॉलमध्ये सहा सिक्स लगावल्या. गौडी टोका नावाच्या बॉलरसमोर जसकरणने हे रेकॉर्ड केलं. आता कृणाल पांड्या यानेही 6 बॉलमध्ये 6 सिक्स मारण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्जच्या नावावरही आहे. गिब्जने 2007 साली वनडे वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्सविरुद्ध हा विक्रम केला होता. नंतर युवराज सिंगने 2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडला 6 बॉलमध्ये 6 सिक्स लगावले होते. कायरन पोलार्डनेही याचवर्षी या यादीत स्थान मिळवलं. मार्च महिन्यात झालेल्या टी-20 मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्ध पोलार्डने अकिला धनंजयाच्या एका ओव्हरला 6 सिक्स मारल्या. ईसपीएन क्रिकइन्फोसोबत बोलताना कृणाल पांड्याला बरेच प्रश्न विचारण्यात आले. करियरच्या शेवटी कोणतं रेकॉर्ड स्वत:च्या नावावर करायला आवडेल? असा प्रश्न कृणालला विचारण्यात आला होता. यावर कृणालने एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारायच्या आहेत असं उत्तर दिलं. मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सर्वाधिक पुश-अप्स क्रिस लीन आणि क्विंटन डिकॉक मारतात, असंही कृणाल म्हणाला. क्रिस गेल हा बॉलिंग करण्यासाठी सगळ्यात कठीण बॅट्समन असल्याचं कृणालने सांगितलं. हार्दिक पांड्याचं कधी स्लेजिंग केलं आहेस का? असंही कृणालला विचारण्यात आलं. 'जेव्हा आम्ही दोघं सराव करत असतो, तेव्हा कोण बरोबर आहे, हे ठरवण्यासाठी तिसरा व्यक्ती तिकडे असणं गरजेचं असतं. आऊट, एक रन, फोर का सिक्स, याचा निर्णय तिसरी व्यक्ती घेते, कारण आम्ही दोघंच असू तर अंतिम निर्णय कधीच येणार नाही,' असं कृणाल म्हणाला.
  Published by:Shreyas
  First published: