Home /News /sport /

T20 World Cup मध्ये चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? आकाश चोप्राने घेतलं याचं नाव

T20 World Cup मध्ये चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? आकाश चोप्राने घेतलं याचं नाव

यंदाच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आधी टीम इंडिया (Team India) आपल्या सर्वोत्तम 11 खेळाडूंचं संयोजन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार, याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने याबाबतचं त्याचं मत मांडलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 12 जुलै : यंदाच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आधी टीम इंडिया (Team India) आपल्या सर्वोत्तम 11 खेळाडूंचं संयोजन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. वर्ल्ड कपआधी भारतीय टीम विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज (India vs England) खेळेल, तर यानंतर लगेच आयपीएलचं (IPL) आयोजन करण्यात येणार आहे. दुसरीकडे आणखी एक भारतीय टीम या महिन्यात शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वात श्रीलंकेविरुद्ध (India vs England) वनडे आणि टी-20 सीरिज खेळणार आहे. टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 सीरिज असणार आहे, त्यामुळे या सीरिजला महत्त्व प्राप्त झालं आहे. 18 जुलैपासून सुरू होणाऱ्या या सीरिजमध्ये सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ, इशान किशन आणि संजू सॅमसन यांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी आहे. यातल्या सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) कामगिरीवर अनेकांचं लक्ष असेल, कारण टी-20 वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार, याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) याच्या मते वर्ल्ड कपमध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने चौथ्या क्रमांकावर खेळावं. आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्राने याचं कारणही सांगितलं आहे. 'जर राहुल आणि रोहित शर्मा ओपनिंगला खेळले आणि विराट तिसऱ्या क्रमांकावर आला, तर तुम्ही हार्दिक आणि पंतला पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर खेळवू शकता. यानंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर आहेत, त्यामुळे फक्त एकच जागा उरते. श्रेयस आणि सुर्यकुमार हे दोघं या जागेसाठी पर्याय आहेत, पण यात निवड करताना कठीण जाणार आहे,' असं आकाश चोप्रा म्हणाला. 'श्रेयस अय्यरच्या बाजूने सध्या तरी गोष्टी आहेत, कारम त्याच्याकडे जास्त अनुभव आहे, तसंच त्याने आधीही वनडे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आयपीएलमध्येही तो टीमचा कर्णधार आहे. जर त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली, तर तुम्ही त्याच्यावर विश्वास दाखवू शकता. टीमसाठी मात्र दोघांपैकी एकाची निवड करणं डोकेदुखी ठरेल, कारण दोन्ही चांगले खेळाडू आहेत,' अशी प्रतिक्रिया आकाश चोप्राने दिली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Shreyas iyer, Suryakumar yadav, T20 world cup, Team india

    पुढील बातम्या