Home /News /sport /

कोण आहे विनी रमन ? जिच्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडू झाला फिदा

कोण आहे विनी रमन ? जिच्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडू झाला फिदा

glenn maxwell with vini raman

glenn maxwell with vini raman

नुकतंच ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwel) लवकरच भारताचा जावई होणार आहे. मॅक्सवेलची भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमन (Vini Raman) हिनं याबाबत खुलासा केला आहे. तर क्रिकेट जगतात विनी रमन आहे तरी कोण अशी चर्चा रंगली आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर: नुकतंच ऑस्ट्रेलिया आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwel) लवकरच भारताचा जावई होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मॅक्सवेलची भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमन (Vini Raman) हिनं याबाबत खुलासा केला आहे. तर क्रिकेट जगतात विनी रमन आहे तरी कोण अशी चर्चा रंगली आहे. तर जाणून घेऊया भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमन आहे तरी कोण? मॅक्सवेलचा गुरुवारी (14 ऑक्टोबर) वाढदिवस झाला. त्या दिवशी विनीनं इन्स्टाग्राम स्टोरीतून तुझ्याशी लग्न करण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही, 2022 हे आपलं वर्ष असेल,' असे जाहिर केले. त्यामुळे लवकरच मॅक्सवेल लग्नबंधनात अडकणार आहे. हे वाचा- IPL 2021: ग्लेन मॅक्सवेल होणार भारताचा जावई, वाढदिवशी आली मोठी अपडेट

  कोण आहे विनी रमन ?

  विनी रामन मूळ भारतीय वंशाचीच आहे. तिचा जन्म 3 मार्च 1993 मध्ये मेलबर्न येथे झाला. ऑस्ट्रेलियातीलच असला तरी तिचे पालक भारतीय आहेत. विनी रमन मूळची दाक्षिण भारताची आहे. तिचे आई-बाबा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात गेले. 28 वर्षांची विनी रामन ही पेशाने फार्मासिस्ट आहे. तिने मेडिकल सायन्समधून पदवी घेतली आहे. विनी रमनची रास मीन आहे. विनीला गोल्फ आणि स्नूकर खेळायला आवडते. तर मार्गरिटा पिज्जा तिचा फेवरेट आहे. विनी रमनला एक बहिण असून मेलबर्नमध्ये ती नर्स म्हणून काम करत आहे. हे वाचा-  IPL 2021 Final: आयपीएलमधील हिट जोडी आहे KKR च्या विजेतेपदातील मोठा अडथळा विनीचा आवडता रंग पिंक असून ती कॉफीची चाहतीची आहे. विनीला नवनवीन ठिकाणी फिरायला आणि पोहायला आवडते. गेल्या वर्षी, मॅक्सवेलनं विनी रमन हिच्याशी 26 फेब्रुवारी रोजी साखरपुडा केला होता. त्यानंतर त्यांनी भारतीय पद्धतीने पुन्हा एकदा साखरपुडा केला. यावेळी मॅक्सवेळ शेरवाणी परिधान करून भारतीय अवतारात दिसला होता. मॅक्सवेल आणि विनी 2 वर्षांपासून एकत्र आहेत, मॅक्सवेलच्या प्रत्येक कठिण प्रसंगी विनी त्याच्यासोबत होती.
  View this post on Instagram

  A post shared by VINI (@vini.raman)

  असे जुळले प्रेमाचे सुत

  सात वर्षांपूर्वी बीबीएल टीम मेलबर्न स्टारच्या कार्यक्रमात ती मॅक्सवेलला पहिल्यांदा भेटली. दोघ 2018पासून एकमेकांना डेट करत आहेत. ग्लेनने पहिल्यांदा तिला प्रपोज केले होते, हेही तिने सांगितले. विनी रमनने आपल्या इन्स्टाग्राम मॅक्सवेलसोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.

  मॅक्सवेलला डिप्रेशनमधून विनीने काढले होते बाहेर

  2019 मध्ये मॅक्सवेलची मानसिक स्थिती खूपच वाईट होती. त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. तेव्हा त्याच्यासोबत त्याला सावरण्यासाठी विनी होती. त्याच्या कठीण काळात त्याला विनीने मोठी साथ दिली आहे. विनीमुळेच पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरण्याची हिम्मत मिळाल्याचे मॅक्सवेलने सांगितले आहे. हे वाचा- IPL 2021 Final: 'या' भारतीय खेळाडूला शेवटची संधी, फेल गेला तर करिअर समाप्त? साखरपुड्यानंतर मॅक्सवेल आणि विनी रमन कधी लग्न करणार, याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. ती आता प्रतिक्षा संपली असे म्हणायला हरकत नाही. कारण विनीने लग्न कधी करणार याची माहिती जाहिर केली आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Australia, Glenn maxwell, India

  पुढील बातम्या