• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • IPL 2021: शाहरुखच्या KKR ला विजय मिळवून देणारा कोण आहे व्यंकटेश अय्यर?

IPL 2021: शाहरुखच्या KKR ला विजय मिळवून देणारा कोण आहे व्यंकटेश अय्यर?

यूएईत सुरू असलेल्या आयपीएलमध्ये KKRने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघावर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली ती ओपनर व्यंकटेश अय्यरने.

  • Share this:
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : इंडियन प्रीमिअर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत (IPLT-20) सोमवारी शाहरूख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला जबरदस्त ओपनर बॅट्समन गवसला आणि शाहरुखसह सगळ्या व्यवस्थापनाचा जीव भांड्यात पडला. यूएईत सुरू असलेल्या आयपीएलमध्ये केकेआरने (KKR) विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघावर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली ती ओपनर व्यंकटेश अय्यरने. व्यंकटेशनी 27 बॉल्समध्ये 7 फोर आणि एका सिक्सच्या बळावर नाबाद 41 रन्स केल्या. KKR ला त्यानिमित्ताने एक ओपनर बॅट्समन (Opener Batsman) गवसला आहे. या आधी ओपनर शुभमन गिलसोबत सुनील नारायण, राहुल त्रिपाठी आणि नीतीश राणा यांना ओपनिंगला पाठवून केकेआरने आजमावून बघितलं होतं पण कुणालाच सूर गवसला नव्हता. व्यंकटेशने मात्र कालच्या सामन्यात नाबाद 41 रन्स करून त्याची निवड सार्थ असल्याचं पदार्पणाच्या सामान्यातच सिद्ध केलं. त्याने रिव्हर्स स्वीप (Reverse Swip) करून मारलेल्या सिक्सचं सर्वांनीच खूप कौतुक केलं. व्यंकटेश हा बॉलिंगही करू शकतो त्यामुळे त्याचा आणखी फायदा KKR ला होऊ शकतो. कोण आहे व्यंकटेश अय्यर? व्यंकटेश अय्यर हा मध्य प्रदेशचा 26 वर्षांचा ऑलराउंडर क्रिकेटर (All Rounder Cricketer) आहे. त्याने देशांतर्गत 38 टी-20 क्रिकेट सामन्यांत 2 अर्धशतकांसोबतच 36 च्या सरासरीने 724 रन्स केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 138 आहे, जो टी-20 च्या मानाने खूपच उत्तम आहे. याच प्रकारात त्याने 26 च्या सरासरीने 21 विकेट्स घेतल्या असून त्याची इकॉनॉमी 7 पेक्षा कमी आहे. 10 फर्स्ट क्लास मॅचमध्ये त्याने 545 रन्स केले असून 7 विकेट्स घेतल्या आहेत. तसंच 24 लिस्ट मॅचमध्ये 849 रन्स केल्या आहेत आणि 10 विकेट्सही घेतल्या आहेत.

RCB vs KKR Live Score: कोलकाताचा विराट सेनेवर 'रॉयल' विजय, अवघ्या 10 ओव्हरर्समध्ये खेळ खल्लास

या खेळीमुळे मिळालं ‘KKR’मध्ये स्थान - या वर्षी फेब्रवारी महिन्यात विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत व्यंकटेश अय्यरने तडाखेबाज 198 रन्सची खेळी केली. त्याने 146 बॉल्समध्ये 20 फोर आणि 7 सिक्स मारले होते. 122 रन्स त्याने केवळ फोर मारून पूर्ण केले होते. त्याचा हा खेळ पाहूनच त्याला आयपीएलमधील केकेआरच्या (IPL KKR) संघात स्थान देण्यात आलं. आयपीएलमधल्या पहिल्या सामन्यातच व्यंकटेशने त्याची निवड सार्थ असल्याचं सिद्ध केलं आणि KKR चा ओपनर बॅट्समनचा शोध संपला. आता या वर्षीच्या आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये जाण्याची केकेआरची आशा आहे.
First published: