मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /सॅम करनवर विक्रमी बोली, तरी ख्रिस मॉरिस ठरला सर्वात महागडा; कसा ते जाणून घ्या

सॅम करनवर विक्रमी बोली, तरी ख्रिस मॉरिस ठरला सर्वात महागडा; कसा ते जाणून घ्या

आयपीएलच्या गेल्या हंगामात ख्रिस मॉरिसला 16.25 कोटी रुपये बोली लागली होती. तर आता सॅम करनला 18.50 कोटी रुपये बोली लावून पंजाब किंग्जने संघात घेतलंय.

आयपीएलच्या गेल्या हंगामात ख्रिस मॉरिसला 16.25 कोटी रुपये बोली लागली होती. तर आता सॅम करनला 18.50 कोटी रुपये बोली लावून पंजाब किंग्जने संघात घेतलंय.

आयपीएलच्या गेल्या हंगामात ख्रिस मॉरिसला 16.25 कोटी रुपये बोली लागली होती. तर आता सॅम करनला 18.50 कोटी रुपये बोली लावून पंजाब किंग्जने संघात घेतलंय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 डिसेंबर : आयपीएल 2023 साठी लागलेल्या बोलींमध्ये आज अनेक खेळाडूंना मोठी रक्कम मिळाली. आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली सॅम करनसाठी लागली. इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटर सॅम करनला पंजाब किंग्जने विक्रमी किंमत मोजून संघात घेतलं. पंजाबने 18.50 कोटी रुपयांत त्याला खरेदी केलं. आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा क्रिकेटर सॅम ठरला असला तरी टेक्निकली तो महागडा ठरत नाही.

गेल्या हंगामात ख्रिस मॉरिसला 16.25 कोटी रुपयांत खरेदी करण्यात आलं होतं. 2021 मध्ये त्याला 16.25 कोटींची आणि आता सॅम करनला 18.50 कोटी रुपयांची बोली लागली तरी मॉरिसच महागडा कसा ठरतो आपण पाहू. क्रिस मॉरिसला 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.

हेही वाचा : IPL Auction 2023 Live : जो रूट, शाकिबसह या खेळाडुंची निराशा, लिलावात राहिले अनसोल्ड

भारतीय चलनानुसार रुपयांमध्ये सॅम करन हा सर्वात महागडा खेळाडू आहे. पण परदेशी खेळाडू बोलीमध्ये मिळणारी रक्कम भारतीय चलनात वापरू शकत नाहीत. त्यांना हे पैसे डॉलरमध्ये कन्व्हर्ट करून घ्यावे लागतात. त्यामुळे सॅम करन आणि क्रिस मॉरिस यांची रक्कम अमेरिकन डॉलरमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर आपल्याला दोघांमध्ये कोण महागडा ठरला ते समजेल.

आयपीएल 2021 मध्ये 18 फेब्रुवारीला लिलाव झाला होता. तेव्हा एका अमेरिकन डॉलरची किंमत 72.61 रुपये इतकी होती. तर आज अमेरिकन डॉलरची किंमत 82.81 रुपये इतकी आहे. 2021 आणि 2022 या दोन्ही लिलावादरम्यान रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत घसरल्याने रुपया स्वस्त आणि डॉलर महाग झाला आहे.

हेही वाचा : IPL Auction : आयपीएलच्या लिलावात दिग्गजांची किंमत घसरली, आधीपेक्षा मिळाले कमी पैसे

सॅम करनला 18.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं आहे. आजच्या दरानुसार डॉलरमध्ये ही रक्कम 22 लाख 34 हजार 30 डॉलर इतकी होती. तर 18 फेब्रुवारी 2021 रोजी ख्रिस मॉरिसला मिळालेली 16.25 कोटी रुपये रक्कम डॉलर्समध्ये बदलल्यास ती 22 लाख 37 हजार 870 डॉलर इतकी होते. दोन्ही खेळाडूंना मिळणाऱ्या डॉलर्सच्या रकमेत फारसा फरक नाही. ख्रिस मॉरिसला सॅम करनपेक्षा 3 हजार 840 डॉलर्स जास्त मिळाले आहेत.

First published:

Tags: IPL 2023, IPL auction