मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

सोलापूर टू इंडिया टीम व्हाया नागालँड, कोण आहे किरण नवगिरे?

सोलापूर टू इंडिया टीम व्हाया नागालँड, कोण आहे किरण नवगिरे?

महिला टी-20 चॅलेंजमध्ये चमक दाखवणाऱ्या किरण नवगिरेला पहिल्यांदाच भारतीय टी-20 संघात स्थान मिळाले आहे. किरण नवगिरेचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील छोट्याशा गावात झाला.

महिला टी-20 चॅलेंजमध्ये चमक दाखवणाऱ्या किरण नवगिरेला पहिल्यांदाच भारतीय टी-20 संघात स्थान मिळाले आहे. किरण नवगिरेचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील छोट्याशा गावात झाला.

महिला टी-20 चॅलेंजमध्ये चमक दाखवणाऱ्या किरण नवगिरेला पहिल्यांदाच भारतीय टी-20 संघात स्थान मिळाले आहे. किरण नवगिरेचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील छोट्याशा गावात झाला.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 20 ऑगस्ट : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला आहे. महिला टी-20 चॅलेंजमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या सोलापूरच्या किरण नवगिरेचा प्रथमच टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ या इंग्लंड दौऱ्यावर 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. महिला टी-20 चॅलेंजमध्ये चमक दाखवणाऱ्या किरण नवगिरेला पहिल्यांदाच भारतीय टी-20 संघात स्थान मिळाले आहे. किरण नवगिरेचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील छोट्याशा गावात झाला. तिने 2016 मध्‍ये क्रिकेट करिअरची सुरूवात केली. सुरुवातीला तिने अॅथलेटिक्स केले, पण नंतर ती क्रिकेटकडे वळली. क्रिकेटच्या मैदानाकडे वळण्यापूर्वी तिने भालाफेक, शॉट पुट आणि रिले शर्यतीतही अनेक पदके जिंकली आहेत. किरण नवगिरेला T20 चॅलेंजमधून ओळख मिळाली - नागालँड संघाकडून खेळताना टी-20 चॅलेंजमध्ये किरण नवगिरे चमकदार कामगिरी केली. किरण या सामन्यात लोसिटी संघाचा भाग होता. त्या सामन्यात तिनं 25 चेंडूत अर्धशतक झळकावल्यानंतर 34 चेंडूत 69 धावा केल्या होत्या. शिवाय किरणने वरिष्ठ महिला टी-20 ट्रॉफीमध्ये नागालँडसाठी 525 धावा केल्या. या स्पर्धेत ती सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. वरिष्ठ महिला टी-20 ट्रॉफीमध्ये नवगिरेने अरुणाचल प्रदेशविरुद्ध 76 चेंडूत 162 धावांची धडाकेबाज खेळी केली. पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये 150 हून अधिक धावा करणारी ती पहिली भारतीय क्रिकेटपटू आहे. हे वाचा - हेल्मेटमध्ये बॉल अडकल्यास बॅट्समन कॅच आऊट होईल? बीसीसीआयची अंपायर्सना गुगली किरण नवगिरेचे वडील शेतकरी आहेत तर आई गृहिणी आहे. तिला दोन भाऊ आहेत. क्रिकेटपटू म्हणून करिअर करण्यापूर्वी ती सुरुवातीला अॅथलेटिक्समध्ये होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीच्या दिवसात तिने पहिल्यांदा क्रिकेट खेळले. तिने 2013-14 ते 2015-16 या हंगामात कोणत्याही औपचारिक प्रशिक्षणाशिवाय विद्यापीठ क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. तिने भालाफेक, शॉट पुट आणि 100 मीटर या ऍथलेटिक स्पर्धांमध्येही पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले होते. तिने तिचे पहिले औपचारिक प्रशिक्षण पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये घेतले, जिथे तिने शारीरिक शिक्षणाचा दोन वर्षांचा कोर्स केला. हे वाचा - पहिल्या वन डेत झिम्बाब्वेचा डाव 189 धावांत संपुष्टात; चहर, कृष्णा, पटेल प्रभावी धोनीची आहे फॅन - दरम्यान, एका मुलाखतीत किरणने सांगितले होते की, ती महेंद्रसिंग धोनीची खूप मोठी फॅन आहे. तसेच ती म्हणाली की मला क्रिकेट खेळायचे आहे कारण मी धोनीप्रमाणे सिक्स मारण्याचे स्वप्न पाहत असे. ती म्हणते की 2011 च्या विश्वचषकात धोनीने विजयी षटकार ठोकला तेव्हा देशासाठी आणि वैयक्तिकरित्या माझ्यासाठी खूप काही बदलले. यामुळे मी आज क्रिकेट खेळत आहे.
First published:

Tags: Cricket, Cricket news

पुढील बातम्या