मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /auction मध्ये सर्वांचंच लक्ष वेधणारी Kaviya Maran आहे तरी कोण?

auction मध्ये सर्वांचंच लक्ष वेधणारी Kaviya Maran आहे तरी कोण?

IPL म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सीझनसाठी खेळाडूंचं ऑक्शन (IPL auction 2021) 18 फेब्रुवारीला चेन्नईत पार पडलं. यादरम्यान सनराइजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) या टीमच्या टेबलवर काव्या मारन (Kaviya Maran) हिनं सर्वांचंच लक्ष वेधलं.

पुढे वाचा ...

मुंबई 19 फेब्रुवारी : IPL म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सीझनसाठी खेळाडूंचं ऑक्शन (IPL auction 2021) 18 फेब्रुवारीला चेन्नईत पार पडलं. यादरम्यान सनराइजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) या टीमच्या टेबलवर काव्या मारन (Kaviya Maran) दिसली. तिचा चेहरा यादरम्यान वारंवार स्क्रीनवर झळकत राहिला आणि सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होऊ लागले. काव्या सन ग्रुपचे मालक कलानिथी यांची मुलगी आणि सनराइजर्स हैदराबाद टीमची सीईओ आहे. ही पहिली वेळ नाही, की काव्याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. याआधीही एसआरएचच्या अनेक सामन्यांवेळी तिनं हजेरी लावली आणि स्क्रीनवरही झळकली.

ऑक्शनबद्दल बोलायचं झाल्यास, सनराइजर्स हैदराबादच्या टीमनं तीन खेळाडू विकत घेतले. टीमनं केदार जाधवला 2 कोटी रुपयात घेतलं आहे. केदारला चेन्नई सुपर किंगनं यंदा टीममध्ये घेतलं नव्हतं. याशिवाय हैदराबादनं अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमानलाही 1.5 कोटीच्या बेस प्राइजमध्येच संघात घेतलं. याशिवाय तिसरा खेळाडू जगदीश सूचित यालाही हैदराबादनं आपल्या टीममध्ये घेतलं. काव्यानं यादरम्यान ट्वीटरवर आपल्या चाहत्यांना याबद्दलच्या सर्व अपडेट दिल्या. या ऑक्शनमध्ये सनराइजर्स हैदराबादला मनाप्रमाणं खेळाडून भेटल्यानं टीम आनंदी असल्याचंही तिनं ट्वीटमध्ये म्हटलं.

सनराइजर्स हैदराबादची टीम -

डेविड वॉर्नर (कर्णधार), केन विलियमसन, जॉनी बेयरेस्टो, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, ऋद्धिमान साहा, प्रियम गर्ग, विजय शंकर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, विराट सिंह, मिचेल मार्श, जेसन होल्डर, मोहम्मद नबी, राशिद खान, शाहबाज नदीम, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, बेसिल थाम्पी, केदार जाधव, मुजीब उर रहमान आणि जगदीश सूचित.

First published:

Tags: Ipl 2021 auction, Sunrisers hyderabad