क्रिकेटपटू युजवेंद्र चहल जिच्या प्रेमात पडला ती धनश्री वर्मा कोण आहे?

क्रिकेटपटू युजवेंद्र चहल जिच्या प्रेमात पडला ती धनश्री वर्मा कोण आहे?

आज युझी आणि धनश्रीचा साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झाला

  • Share this:

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याच्या साखरपुड्याच्या बातमीने अनेकांना धक्काच बसला. त्याने आज सोशल मीडियावर त्याच्या साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले. धनश्री वर्मा नावाच्या एका तरुणीसोबत तो लवकरच विवाह बंधनात बांधला जाणार आहे. पण सध्या सोशल मीडियावर धनश्री वर्माबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावेळी युजवेंद्र याने 'कुटुंबाच्या संमतीने आम्ही एकमेकांच्या हो म्हणत आहोत', असं कॅप्शन देत त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.कोरोना काळात झालेल्या या छोटेखानी सोहळ्यात या दाम्पत्याचे कुटुंबीय उपस्थित होते

कोण आहे धनश्री वर्मा?

धनश्री वर्मा एक यूट्यूबर असून डान्सर व कोरिओग्राफर आहे. तिची स्वत:ची कंपनीही आहे. धनश्री वर्मा नावाची तिची स्वत:ची कंपनीही आहे. धनश्री वर्मा बॉलिवूड गाण्यांवर डान्स करते. याशिवाय तिने हिपहॉपचं प्रशिक्षणही घेतलं आहे. तिच्या यूट्यूब चॅनलला 1.5 मिलिअन सबस्क्रायबर आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 8, 2020, 9:26 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading