मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL Auction 2021 Live : प्रिती झिंटाच्या टीमकडून खेळणार शाहरुख खान, मोठ्या किंमतीमध्ये केली खरेदी

IPL Auction 2021 Live : प्रिती झिंटाच्या टीमकडून खेळणार शाहरुख खान, मोठ्या किंमतीमध्ये केली खरेदी

तामीळनाडूचा आक्रमक बॅट्समन असलेल्या शाहरुख खानने नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) धमाकेदार बॅटिंग केली होती.w

तामीळनाडूचा आक्रमक बॅट्समन असलेल्या शाहरुख खानने नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) धमाकेदार बॅटिंग केली होती.w

तामीळनाडूचा आक्रमक बॅट्समन असलेल्या शाहरुख खानने नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) धमाकेदार बॅटिंग केली होती.w

    चेन्नई, 18 फेब्रुवारी :  बॉलीवूडमध्ये राज्य केल्यानंतर शाहरूख खान (Shahrukh Khan) क्रिकेटच्या मैदानाकडे वळला. शाहरुखच्या मालकीची असलेली कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आयपीएलच्या (IPL) यशस्वी टीमपैकी एक आहे. आता आणखी एक शाहरुख खान आयपीएलचं मैदान गाजवायला तयार झाला आहे.

    शाहरुख खानची या आयपीएलसाठी 20 लाख इतकी बेस प्राईज होती. मात्र त्याच्या उपयुक्ततेवर विश्वास असलेल्या आयपीएल टीममध्ये त्याला खरेदी करण्यासाठी जोरदार स्पर्धा रंगली होती. त्यानं पाहता-पाहता एक कोटीची किंमत ओलांडली तरीही त्याच्यासाठी बोली लागत होती. अखेर प्रिती झिंटाच्या (Preity Zinta) पंजाब किंग्जनं (PKBS) तब्बल 5 कोटी 25 लाख रुपयांना खरेदी केलं.

    कोण आहे शाहरुख खान?

    तामीळनाडूचा आक्रमक बॅट्समन असलेल्या शाहरुख खानने नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) धमाकेदार बॅटिंग केली होती. शाहरुखच्या या कामगिरीमुळे तामीळनाडूने सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

    बडोद्याविरुद्धच्या फायनलमध्ये शाहरुखला फार काही करण्यासारखं नव्हतं. 7 बॉलमध्ये 18 रन करून तो नाबाद राहिला. पण हिमाचल प्रदेशविरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये शाहरुखने तामीळनाडूला हरलेली मॅच जिंकवून दिली. मोटेरा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात त्याने 19 बॉलमध्ये 40 रन केले.

    हिमाचल प्रदेशने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना तामीळनाडूची अवस्था 13 ओव्हरमध्ये 5 आऊट 66 अशी नाजूक झाली होती झाली होती. ओपनर जगदीशन आणि निशांत लगेचच आऊट झाले, तर दिनेश कार्तिक फक्त 2 रन करून माघारी परतला. पण 25 वर्षांच्या शाहरुखने बाबा अपराजितच्या साथीने तामीळनाडूला जिंकून दिलं होतं.

    लोअर ऑर्डरमध्ये आक्रमक बॅटिंग करणारा बॅट्समन पंजाबला हवा होता. त्याच उद्देशानं पंजाबनं मोठ्या अपेक्षेनं शाहरुख खानला खरेदी केलं आहे.

    First published:
    top videos

      Tags: IPL 2021, Ipl 2021 auction