मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs NZ: टीम इंडियाच्या पराभवाचे 3 सर्वात मोठे व्हिलन, यांना 306 धावाही पडल्या अपुऱ्या

Ind vs NZ: टीम इंडियाच्या पराभवाचे 3 सर्वात मोठे व्हिलन, यांना 306 धावाही पडल्या अपुऱ्या

कोण ठरले भारताच्या पराभवाचे व्हिलन?

कोण ठरले भारताच्या पराभवाचे व्हिलन?

Ind vs NZ: भारतानं या सामन्यात 306 धावांचा डोंगर उभारला खरा पण त्याचा बचाव करणं भारतीय गोलंदाजांना जमलं नाही. भारताचे सध्याचे तीन आघाडीचे गोलंदाज या सामन्यान टीम इंडियासाठी सर्वात मोठे व्हिलन ठरले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

ऑकलंड, 25 नोव्हेंबर: भारत आणि न्यूझीलंडमधल्या पहिल्या वन डेत तब्बल 600 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पडला. पण ऑकलंडचं ईडन पार्क मैदान भारतासाठी मात्र पुन्हा एकदा अनलकी ठरलं. या मैदानात भारतानं 2003 नंतर एकही वन डे जिंकलेली नाही. आजही तोच इतिहास टीम इंडियाला पुसता आला नाही. भारतानं या सामन्यात 306 धावांचा डोंगर उभारला खरा पण त्याचा बचाव करणं भारतीय गोलंदाजांना जमलं नाही. भारताचे सध्याचे तीन आघाडीचे गोलंदाज या सामन्यान टीम इंडियासाठी सर्वात मोठे व्हिलन ठरले.

अर्शदीप सिंग

टी20 क्रिकेटमध्ये अर्शदीप सिंग हे सध्या सर्वात चर्चेतलं नाव. टी20 त डावखुऱ्या अर्शदीपनं गेल्या काही महिन्यात दमदार कामगिरी केली आहे. म्हणूनच वन डे क्रिकेटमध्ये आज धवननं अर्शदीपला पदार्पणाची संधी दिली. पण पहिल्याच सामन्यात अर्शदीपनं यजमान संघासमोर प्रभाव पाडता आला नाही. त्यानं 8.1 ओव्हरमध्ये सर्वाधिक 68 धावा बहाल केल्या.

युजवेंद्र चहल

युजवेंद्र चहलकडे या दौऱ्यात भारताचा सर्वात अनुभवी स्पिनर म्हणून पाहिलं जातं. पण ऑकलंड वन डेत चहलला 10 ओव्हर्समध्ये एकही विकेट घेता आली नाही. या सामन्यात त्याच्या गोलंदाजीचं समीकरण होतं... 10-0-67-0.

हेही वाचा - FIFA WC 2022: रोनाल्डोच्या आयुष्याचे 5 नियम... म्हणून दारु, सिगरेट आणि टॅटूपासून दूर आहे हा स्टार फुटबॉलर!

शार्दूल ठाकूर

शार्दूल ठाकूरनही आतापर्यंत टीम इंडियासाठी बरंच क्रिकेट खेळलं आहे. पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये त्यानं नियंत्रित मारा केला. पण ऐन मोक्याच्या क्षणी त्याच्या एका ओव्हरनं सामन्याचा रंगच बदलला. शार्दूलनं आपल्या आठव्या ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा दिल्या आणि इथेच मॅच भारताच्या हातून सुटली. त्यानं आपल्या शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये 38 धावा बसल्या.

दरम्यान आता उभय संघातला दुसरा वन डे सामना रविवारी सकाळी खेळवला जाणार आहे.

First published:

Tags: Sports, Team india