जयपूर, 06 नोव्हेंबर: ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी सामन्यादरम्यान एका खेळाडूचा दुर्दैवी अंत (kabaddi player went for entry and died) झाला आहे. कबड्डी खेळताना सर्व्हिस टाकायला गेलेल्या खेळाडूला प्रतिस्पर्धी संघाने पकडल्यानंतर संबंधित रायडर अचानक बेशुद्ध पडला. संबंधित खेळाडूला आयोजकांनी त्वरीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण याठिकाणी डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्याला मृत घोषित केलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुण मुलावर अचानक ओढावलेल्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
संबंधित घटना राजस्थानातील टोंक जिल्ह्याच्या नवरंगपुरा येथील आहे. तर दामोदर गुर्जर असं मृत पावलेल्या 21 वर्षीय तरुणाचं नाव असून तो बौंली येथील रंवासा गावातील रहिवासी होता. दिवाळी सणाच्या तोंडावर 1 नोव्हेंबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान नवरंगपुरा याठिकाणी कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, बुधवारी रात्री आठच्या सुमारास चाकसू आणि बोरखंडी या दोन संघामध्ये अंतिम सामना रंगला होता. अटीतटीच्या या सामन्यात चाकसू संघाकडून दामोदर सर्व्हिस टाकायला गेला.
हेही वाचा-मामाच्या गावाला जाताना बहीण-भावावर काळाचा घाला; भाऊबीजेआधीच झाला हृदयद्रावक शेवट
दामोदर सर्व्हिससाठी गेला असता प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी त्याला घेरलं. यानंतर काही सेकंदातच पंचानी दामोदर याला आऊट दिलं. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूने त्याला सोडलं. पण दामोदर मैदानावरून उठलाच नाही. यावेळी मैदानातील खेळाडू आणि आयोजकांनी दामोदरला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही शुद्धीवर आला नाही. त्यामुळे घाबरलेल्या आयोजकांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.
हेही वाचा-सख्खा भाऊच जीवावर उठला; ऐन दिवाळीत धाकट्यावर कुऱ्हाडीने घाव घालत केला खेळ खल्लास
रुग्णालयात दाखल केल्यानंतर, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दामोदर याची प्राथमिक तपासणी करून त्याला मृत घोषित केलं आहे. अंतिम सामन्यात एका खेळाडूचा अशाप्रकारे अंत झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून कुटुंबीयांना देखील धक्का बसला आहे. या घटनेनं कबड्डी प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rajasthan