• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे सामने निसटले'; Team India वर भडकले सुनिल गावस्कर

'ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे सामने निसटले'; Team India वर भडकले सुनिल गावस्कर

Sunil Gavaskar

Sunil Gavaskar

दिग्गज माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाच्या अपयशाची कारणे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर: यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजली जाणारी भारतीय क्रिकेट टीम फ्लॉप ठरली. टीम इंडियाच्या निराशजनक कामगिरीमुळे स्पर्धेतील टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अशातच, दिग्गज माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाच्या अपयशाची कारणे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 स्टेजमधूनच टीम इंडिया (Team India) आऊट झाली आहे. रविवारी दुपारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा (New Zealand vs Afghanistan) पराभव केला, त्याचबरोबर भारताचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्नही भंगलं. यंदाच्या स्पर्धेत ना कुणाची बॅट चालली ना कुणाचा बॉल फिरला. यासर्वावर भाष्य करताना गावस्कर यांनी दोन कारणे दिली आहेत. गावस्करांच्या मते, टीम इंडियाच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याचे पहिले प्रमुख कारण म्हणजे फलंदाजांनी पॉवरप्लेचा चांगला उपयोग न करणे. ज्या प्रकारची फलंदाजी पहिल्या 6 षटकांमध्ये व्हायला हवी होती, ती दिसली नाही. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही, ज्याचा फटका संघाला सहन करावा लागला. पहिल्या 6 षटकांमध्ये फक्त 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. मात्र याचा फायदा भारताने घेतला नाही. गेल्या अनेक स्पर्धांमध्ये भारताला याचा फायदा घेता आलेला नाही. तगड्या प्रतिस्पर्ध्यासमोर भारतीय संघ मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला आहे. तसेच, न्यूझीलंड संघाचे उदारहण देत ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियाच्या हातून सामने निसटले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, तुम्ही न्यूझीलंडचे क्षेत्ररक्षण पाहा, ते ज्या पद्धतीने चेंडू स्विंग करतात, धावा वाचवतात, झेल घेतात, ते केवळ आश्चर्यकारक आहे. आक्रमणात जीव नसला तरी आणि खेळपट्टी सपाट असली तरी उत्तम क्षेत्ररक्षणामुळे सामन्यात फरक पडू शकतो. पण जर तुम्ही भारतीय संघ पाहिला तर 3-4 खेळाडू वगळता इतर खेळाडूंकडून धावा वाचवण्याची किंवा मैदानावर डाईव्ह मारण्याची अपेक्षा तुम्ही करू शकत नाही.
  Published by:Dhanshri Otari
  First published: