मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

सौरव गांगुली झाला KBC चा एँकर, हॉट सीटवर बसल्यानंतर बिग बी म्हणाले... VIDEO

सौरव गांगुली झाला KBC चा एँकर, हॉट सीटवर बसल्यानंतर बिग बी म्हणाले... VIDEO

KBC मध्ये गांगुली झाला अँकर, तर बिग बी बसले हॉट सीटवर

KBC मध्ये गांगुली झाला अँकर, तर बिग बी बसले हॉट सीटवर

कौन बनेगा करोडपतीच्या 13 (KBC 13) व्या मोसमात सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) सहभागी झाले. शोच्या सुरुवातीलाच सौरव गांगुली बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या खूर्चीवर बसला.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 3 सप्टेंबर : कौन बनेगा करोडपतीच्या 13 (KBC 13) व्या मोसमात सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)  सहभागी झाले. शोच्या सुरुवातीलाच सौरव गांगुली बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या खूर्चीवर बसला, तर खुद्द अमिताभ बच्चन हॉटसीटवर सेहवागच्या बाजूला बसले. सौरव गांगुलीने अमिताभ बच्चन यांना विनंती करून हॉट सीटवर बसवलं आणि काही प्रश्न विचारले.

सोनी टीव्हीने शेयर केलेल्या इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये सौरव गांगुली अमिताभ बच्चन यांचं शोमध्ये स्वागत करतो. तसंच तुमच्याकडे फक्त एकच लाईफलाईन आहे, असंही सांगतो. सौरव गांगुलीने अमिताभ बच्चन यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. यावर बिग बींनीही मजेशीर उत्तर दिलं. इकडे बसणाऱ्याची अवस्था कशी होते, हे आता लक्षात येत आहे, असं बिग बी म्हणाले.

अमिताभनं यावेळी सेहवागला तू क्रिकेट खेळताना गाणं म्हणायस का? अला प्रश्न विचारला. त्यावर सेहवागनं चला जाता हूँ किसी की धुन में... हे गाणं गाऊन दाखवलं. कॅच सुटल्यावरच्या परिस्थितीमध्ये कोणतं गाणं फिट बसतं असा प्रश्न अमिताभनं सेहवागला विचारल्याचं या प्रोमोत दाखवण्यात आलं आहे. तसंच सेहवागनं यावेळी टीम इंडियाची माजी कोच ग्रेग चॅपल यांच्या मुद्यावर सौरव गांगुलीची गाण्यातून फिरकी घेतली. सेहवागनं हे गाणं ऐकताच गांगुली आणि अमिताभ या दोघांनाही हसू आवरलं नाही.

सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग या कार्यक्रमात जिंकलेली रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरणार आहेत. सौरव गांगुली फाऊंडेशन आणि वीरेंद्र सेहवाग फाऊंडेशनला ही रक्कम दिली जाणार आहे.

First published:

Tags: Amitabh Bachchan, KBC, Sourav ganguly, Virender sehwag