टायगर पतौडींची खराब कामगिरी, वडिलांनी शर्मिला टागोर यांच्यावरच फोडलं होतं खापर

टायगर पतौडींची खराब कामगिरी, वडिलांनी शर्मिला टागोर यांच्यावरच फोडलं होतं खापर

बॉलिवूड (Bollywood) आणि क्रिकेट(Cricket) यांचं नातं खूप जवळचं आहे. जुन्या काळातील एका जोडीची आजही चर्चा होते ती जोडी म्हणजे नबाब मन्सूर अली खान पतौडी (Nawab Mansoor Ali khan Pataudi) आणि शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांची.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल : बॉलिवूड (Bollywood) आणि क्रिकेट(Cricket) यांचं नातं खूप जवळचं आहे. अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि अभिनेत्री यांच्या प्रेमाचे किस्से सर्वश्रुत आहेत. क्रिकेटपटू आणि अभिनेत्री यांनी विवाह केला असून, त्यांच्या जोड्या लोकप्रिय आहेत. सध्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी अगदी प्रसिद्ध आहे; पण बॉलीवूड आणि क्रिकेट यांच्या घनिष्ट नात्याचा इतिहास खूप जुना आहे. जुन्या काळातील एका जोडीची आजही चर्चा होते ती जोडी म्हणजे नबाब मन्सूर अली खान पतौडी (Nawab Mansoor Ali khan Pataudi) आणि शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांची. अनेकवेळा पतीच्या मैदानातल्या खराब कामगिरीमुळे त्याच्या पत्नीला ट्रोलिंगचा सामना करायला लागल्याची अनेक उदाहरणं आपण बघतो. शर्मिला टागोरही याला अपवाद नाहीत.

अलीकडेच इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (Indian Chamber of Commerce) महिला विभागाच्या वतीनं शर्मिला टागोर यांचं लाईव्ह सेशन (Live Session)आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी नवाब मन्सूर अली खान पतौडी आणि आपल्या प्रेमप्रकरण सुरू असतानाच्या काळतील, तसंच पतौडी यांच्याबाबतचे काही किस्से सांगितले. यातील एक किस्सा फारच भन्नाट होता.

नवाब मन्सूर अली खान पतौडी हे एक प्रसिद्ध क्रिकेटपटू होते. टायगर (Tiger Pataudi) म्हणून ते प्रसिद्ध होते. शर्मिला यांच्याशी विवाह झाल्यानंतरच्या काळात एका सामन्यात पतौडी यांच्याकडून एक कॅच (Catch) सुटला. ते बघून शर्मिला यांच्या वडीलांनी शर्मिला यांनाच त्यासाठी जबाबदार धरत,अजबच टिप्पणी केली.

शर्मिला यांचे वडील त्यांना ओरडून म्हणाले, ‘तू त्याला रात्रभर जागतं ठेवत जाऊ नकोस. ’हे ऐकून शर्मिला अगदी ओशाळवाण्या झाल्या होत्या. शर्मिला टागोर यांनी या वेळी पतौडी यांच्याशी झालेली भेट, त्यांची विनोदबुद्धी,शर्मिला यांना प्रभावित करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न याचेही काही किस्से सांगितले. शर्मिला आणि पतौडी यांची पहिली भेट एका कॉमन मित्रामुळे झाली होती. त्यांची भेट झाली तेव्हा पतौडी यांची किक्रेटमधील कारकीर्द बहरली होती; तर शर्मिलाही बॉलिवूडमधील स्टार होत्या. शर्मिला या क्रिकेटच्या जबरदस्त चाहत्या होत्या. ते दोघं भेटले की पतौडी नेहमी ब्रिटिश ॲक्सेंटमध्ये बोलत असत,असं त्या म्हणाल्या.

पतौडी यांची विनोदबुद्धीही अजब होती, ते आपल्या स्वतःच्याच विनोदावर हसत असत, असंही शर्मिला यांनी सांगितलं. एकदा पतौडी यांनी शर्मिला यांना एक कविता भेट दिली आणि सांगितलं की, ती त्यांनी स्वतः लिहिली आहे. शर्मिला यांनी ती कविता फिरोज खान यांना दाखवली तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या कवितेच्या ओळी प्रसिद्ध उर्दू शायर गालिब यांच्या आहेत. शर्मिला यांनी तब्बल चार वर्षानंतर लग्नाला होकार दिला. त्यानंतर नबाब पतौडी आणि त्यांचा शाही थाटात विवाह झाला.

First published: April 17, 2021, 2:48 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या