#IndVsNz : ...जेव्हा सचिन मध्यरात्री बॅले डान्सर घेऊन आला

क्रिकेटच्या मैदानावर शांत असणाऱ्या सचिनच्या ड्रेसिंगरूम आणि इतरवेळी खट्याळ वागणुकीचा एक किस्सा दिवंगत माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी शेअर केला होता.

News18 Lokmat | Updated On: Jan 22, 2019 10:58 AM IST

#IndVsNz : ...जेव्हा सचिन मध्यरात्री बॅले डान्सर घेऊन आला

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला 23 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडविरूद्धच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला 23 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडविरूद्धच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

 क्रिकेटच्या मैदानावर शांत असणाऱ्या सचिनच्या ड्रेसिंगरूम आणि इतरवेळी खट्याळ वागणुकीचा एक किस्सा दिवंगत माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी शेअर केला होता.

क्रिकेटच्या मैदानावर शांत असणाऱ्या सचिनच्या ड्रेसिंगरूम आणि इतरवेळी खट्याळ वागणुकीचा एक किस्सा दिवंगत माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी शेअर केला होता.

1994 मध्ये भारत न्यूझीलंड दौऱ्यावर असताना वाडेकर भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक होते. त्यावेळी वाडेकरांच्या वाढदिवसाला सचिन तेंडुलकर 6 बॅले डान्सरना घेऊन आला होता.

Loading...

वाडेकरांना मध्यरात्री झोपेतून उठवले आणि कपिल देव यांना त्रास होत असल्याचे सांगितले. अजित वाडेकरांनी सचिनने सांगितल्यावर लगेच कपिल देव यांच्या खोलीकडे धाव घेतली.

कपिल देव यांच्या खोलीत वाडेकर पोहचले तर आधीच तिथं भारतीय खेळाडू हजर होते. त्यानंतर जे झाले ते पाहून तर वाडेकरांना धक्काच बसला.

कपिल देव यांच्या बाजूच्या रूममधून सहा बॅले डान्सर रूममध्ये येऊन डान्स सुरू केला. यानंतर सर्वांनी वाडेकरांचा वाढदिवस साजरा केला.

एका मुलाखतीवेळी वाडेकरांनी हा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते की, तेव्हाच यामागे सचिनचं डोकं असणार हे  ओळखलं. गेल्या वर्षी 15 ऑगस्टला वाडेकरांचे निधन झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2019 10:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...