News18 Lokmat

सचिनने आजच्या दिवशी पाकला असा दिला होता दणका, ते कधीही विसरणार नाहीत

पाकला चपराक देणारा सचिनचा 15 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक षटकार

News18 Lokmat | Updated On: Mar 1, 2019 11:40 AM IST

सचिनने आजच्या दिवशी पाकला असा दिला होता दणका, ते कधीही विसरणार नाहीत

भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशात सीमेवरील कट्टरपणा खेळाच्या मैदानातही दिसून येतो. या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी 1 मार्च 2003 भारत-पाक सामन्यात सचिनने मारलेल्या षटकाराची आठवण झाली.

2003 च्या वर्ल्डकप स्पर्धेत सेंच्युरिअन मैदानावर भारत-पाक एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 273 धावा केल्या होत्या.

पाकिस्तानने दिलेलं 273 धावांचं आव्हान पार करणं भारताला सहज शक्य नव्हतं.  त्यावेळी पाकिस्तानच्या संघात दिग्गज गोलंदाजांची फौज होती.

Loading...

पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताचे सलामीवीर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग मैदानात उतरले होते. त्यांनी पहिल्या 5 षटकांतच 50 धावा केल्या होत्या.

सेहवाग लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार सौरव गांगुली सुद्धा लगेच तंबूत परतला. यावेळी एक बाजू सांभाळत सचिन तेंडुलकर मैदानात उभा होता.

सचिनने मोहम्मद कैफला साथीला घेऊन सचिनने शतकी भागिदारी केला. यात मोहम्मद कैफने 35 धावा केल्या. त्याला शाहिद आफ्रिदीने बाद केलं.

भारतीय संघाने 25 षटकांत अर्ध्याहून अधिक धावांचा टप्पा पार केला होता. त्यावेळी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या गोलंदाजीला सचिन सडेतोड उत्तर देत होता.

अख्तरने सचिन तेंडुलकरला बाऊन्सर टाकून डिवचण्याचा प्रयत्न केला. यातील एक-दोन चेंडू सचिनच्या हेल्मेटवरही आदळले.

सचिनने या सामन्यात 75 चेंडूत 98 धावांची खेळी केली. यात 12 चौकार आणि  एका षटकाराचा समावेश होता. आजही हा षटकार पाकिस्तानला लगावलेली चपराक म्हणून लक्षात राहतो.

रावळपिंडी एक्सप्रेस अशी ओळख असलेल्या शोएब अख्तरने आखूड टप्प्याचा बाहेर जाणारा चेंडू टाकला. यावर सचिनने अप्पर कट खेळत लगावलेला षटकार हा शोएब अख्तरसह पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणारा होता.

शोएब अख्तरच्याच चेंडूवर सचिन झेलबाद झाला. सचिन बाद झाल्यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून आनंद साजरा केला. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत 12 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

भारताने हा सामना 26 चेंडू राखून जिंकला होता. यात राहुल द्रविडने 44 तर युवराज सिंगने 50 धावा केल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 1, 2019 11:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...