Home /News /sport /

...तेव्हा द्रविड धोनीवर संतापला होता, सेहवागने सांगितला किस्सा

...तेव्हा द्रविड धोनीवर संतापला होता, सेहवागने सांगितला किस्सा

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने राहुल द्रविडचा (Rahul Dravid) धोनीवर (MS Dhoni) भडकल्याचा किस्सा सांगितला आहे.

    मुंबई, 11 एप्रिल : राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) एका जाहिरातीमुळे इंदिरानगर का गुंडा सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) सुरू होण्याआधी केलेल्या एका जाहिरातीमध्ये राहुल द्रविडचा पारा चांगलाच चढल्याचं दिसत आहे. 'इंदिरानगर का गुंडा हूं मै' असं म्हणत ट्रॅफिकमध्ये अडकलेला राहुल द्रविड समोरच्या गाडीवर बॅटने मारत आहे. कायमच शांत स्वभावामुळे ओळखला जाणारा राहुल द्रविड या जाहिरातीत भडकलेला दिसत असल्यामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने द्रविडचा धोनीवर (MS Dhoni) भडकल्याचा किस्सा सांगितला आहे. 2006 सालच्या पाकिस्तान दौऱ्यात धोनी चुकीचा शॉट मारून आऊट झाला, यानंतर द्रविड चांगलाच संतापला. गांगुली कर्णधार असताना धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. गांगुलीनंतर राहुल द्रविड टीमचा कर्णधार बनला होता. क्रिकबझशी बोलताना सेहवाग म्हणाला, 'मी राहुल द्रविडला नाराज होताना बघितलं आहे. जेव्हा आम्ही पाकिस्तान दौऱ्यावर गेलो होतो तेव्हा धोनी टीममध्ये नवा होता. पॉईंटच्या दिशेने शॉट मारून तो आऊट झाला, यानंतर द्रविड संतापला. तू अशाप्रकारे खेळतोस का? तू मॅच संपवली पाहिजे होतीस. द्रविडने इंग्रजी शब्दांचा प्रयोग केला, त्यामुळे मीदेखील हैराण झालो. पण द्रविडने बोललेल्या बऱ्याच गोष्टी मला समजल्याच नाहीत.' जेव्हा पुढच्या सामन्यात धोनी बॅटिंगला आला तेव्हा त्याने जास्त शॉट मारले नाहीत. याबाबत मी त्याला विचारलं, तेव्हा मला पुन्हा द्रविडचा ओरडा खायचा नाही, चुपचाप मॅच संपवेन आणि मैदानातून बाहेर जाईल, असं उत्तर धोनीने दिल्याचं सेहवागने सांगितलं. 2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये धोनी टीम इंडियाचा कर्णधार झाला, त्यावेळी भारताने वर्ल्ड कपही जिंकला. यानंतर धोनीच्याच नेतृत्वात भारताने 2011 चा 50 ओव्हरचा वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही विजय मिळवला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या