ICC पण म्हणतंय, स्टंपच्या मागे धोनी असताना क्रीज सोडायची नसते

ICC पण म्हणतंय, स्टंपच्या मागे धोनी असताना क्रीज सोडायची नसते

आयसीसीनेही धोनीपासून फलंदाजांना सावध करणारं ट्विट केलं आहे.

  • Share this:

दिल्ली, 4 फेब्रुवारी : भारताने न्यूझीलंडविरुद्धचा पाचवा एकदिवसीय सामना जिंकून मालिका 4-1 ने खिशात टाकली. यात पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीचं महत्त्व अधोरेखित झालं. अलिकडे त्याच्या संथ खेळीवरून अनेकांनी त्याला निवृत्तीचा सल्ला दिला होता. पण फलंदाजीत जरी तो कमी पडत असला तरी मैदानावर यष्टीमागे त्याचा कोणीही हात धरू शकत नाही.

धोनी यष्टीरक्षण करत असेल तर खेळणारा फलंदाज पुढे जाऊन खेळण्याचा विचारही करणार नाही. यावर आयसीसीनेही फलंदाजांना एक प्रकारे सावध करणारं ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये म्हटलं आहे की, धोनी स्टंपच्या मागे असताना क्रीज सोडायची नसते. विशेष म्हणजे आयुष्य सुंदर होण्यासाठी काय केलं पाहिजे हे विचारणाऱ्या एका ट्विटला रिट्विट करताना आयसीसीनं म्हटलं आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात निम्मा संघ बाद केल्यानंतरही भारताच्या विजयात फलंदाज जिमी नीशाम अडथळा बनला होता. निशामने 32 चेंडूत 44 धावा केल्या. 37 व्या षटकात केदार जाधवच्या गोलंदाजीवर तो नाट्यमयरित्या धावबाद झाला. षटकातील दुसऱ्या चेंडूवर धोनी आणि केदार जाधवने पायचितचे अपिल केलं. मात्र ते पंचांनी फेटाळून लावलं. पायचितचे अपिल फेटाळून लावले तेव्हा चेंडू कुठे आहे हे न पाहताच निशामने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा धोनीने चपळाई करत अचूक फेकीवर त्याला धावबाद केलं.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धोनीच्या थ्रोवर भारताच्या विजयात अडसर बनलेल्या नीशामला धावबाद झाला. जर नीशाम बाद झाला नसता तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा असता.

First published: February 4, 2019, 9:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading