World Cup Final: 'त्याने' वर्ल्ड कप नव्हे तर प्रशिक्षकांना देखील गमावले!

World Cup Final: 'त्याने' वर्ल्ड कप नव्हे तर प्रशिक्षकांना देखील गमावले!

त्याने 14 जुलै रोजी वर्ल्ड कप तर गमवलाच पण त्यापाठोपाठ क्रिकेटचे धडे शिकवणाऱ्या प्रशिक्षकांना देखील गमावले.

  • Share this:

ऑकलंड, 19 जुलै: आयसीसी वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचे विजेते होण्याचे स्वप्न भंगले. 50 षटकात दोन्ही संघांनी समान धावा केल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. या सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने दिलेल्या 16 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या जेम्स नीशामने दुसऱ्याच चेंडूवर षटकार मारला होता. या षटकारामुळे न्यूझीलंडने सुपर ओव्हरमध्ये सामन्यावर पकड मिळवली होती. पण अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना त्यांना एकच धाव घेता आली आणि इंग्लंड विजयी ठरला. विशेष म्हणजे याआधीच्या 2015च्या वर्ल्ड कपमध्ये देखील न्यूझीलंड फायनलमध्ये पोहोचला होता आणि तेव्हा देखील त्यांचा पराभव झाला होता.

न्यूझीलंडच्या संघात असा एक खेळाडू आहे ज्याने 14 जुलै रोजी वर्ल्ड कप तर गमवलाच पण त्यापाठोपाठ क्रिकेटचे धडे शिकवणाऱ्या प्रशिक्षकांना देखील गमावले. सुपर ओव्हरमध्ये शानदार षटकार मारणाऱ्या जेम्सने षटकार मारला तेव्हा त्याचे शाळेतील शिक्षक आणि क्रिकेटचे सुरुवातीचे धडे शिकवणारे कोच डेव्हिड गॉर्डन यांचे निधन झाले. जेम्सचे कोच गॉर्डन अंतिम सामन्याच्या दिवशी रुग्णालयात होते. त्यांची प्रकृती नाजूक होती. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुपर ओव्हर सुरु असताना गॉर्डन यांचे श्वास कमी झाला आणि त्या दरम्यानच त्यांचे निधन झाल्याचे एका नर्सने सांगितले.

यासंदर्भात बोलताना गॉर्डन यांची मुलगी लिओनी म्हणाली, माझ्या बाबांनी जेम्स नीशाम, लॉकी फर्ग्युसन आणि अन्य खेळाडूंना शालेय क्रिकेटचे धडे दिले होते. जेम्सने जेव्हा षटकार मारला असेल तेव्हा त्यांना नक्कीच आनंद झाला असेल. गॉर्डन यांनी 25 वर्ष शाळेतील मुलांना क्रिकेट आणि हॉकीचे प्रशिक्षण दिले होते.

जेम्स नीशामने वाहिली श्रद्धांजली...

गॉर्डन माझे शाळेतील शिक्षक, प्रशिक्षक आणि मित्र होते. खेळाविषयीचे तुमचे प्रेम अनुकरण करण्यासारखे होते. ज्यांना तुमच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली ते निशिबवान होते. मला आशा वाटते की आम्ही केलेल्या कामगिरीमुळे त्यांना अभिमान वाटला असेल. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असे ट्विट जेम्सने केले होते.

नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार; 13 नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपच्या वाटेवर?

First published: July 19, 2019, 10:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading