News18 Lokmat

जेव्हा बीसीसीआयची वेबसाईट ऑफलाईन होते...

यामध्ये सर्वात मोठी बोली २७० डॉलरची आहे़. बीसीसीआयच्या वेबसाईटचं डोमेन 2 फेब्रुवारी 2006 पैसून ते 2 फेब्रुवारी 2019 पर्यंत वैध आहे. मात्र डोमेन अपडेट करण्याची तारीख 3 फेब्रुवारी होती

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Feb 4, 2018 11:16 PM IST

जेव्हा बीसीसीआयची वेबसाईट ऑफलाईन होते...

04 फेब्रुवारी:  बीसीसीआयची नुकतीच एक खूप मोठी  पंचाईत झाली.  डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट बीसीसीआय डॉट टीव्ही या बीसीसीआयच्या वेबसाईटचं डोमेन वेळेवर रिन्यू न करता आल्यामुळं बीसीसीआयची वेबसाईट विक्रीला काढल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

वेबसाईटची नोंदणी करणारी register.com आणि namejet.com ने या डोमेन नावाला सार्वजनिक बोलीसाठी ठेवले आहे़. त्याला आतापर्यंत सात बोली मिळाल्या आहेत़. यामध्ये सर्वात मोठी बोली २७० डॉलरची आहे़. बीसीसीआयच्या वेबसाईटचं डोमेन 2 फेब्रुवारी 2006 पैसून ते 2 फेब्रुवारी 2019 पर्यंत वैध आहे. मात्र डोमेन अपडेट करण्याची तारीख 3 फेब्रुवारी होती. धक्कादायक बाब म्हणजे आज दक्षिण आफ्रिकाविरुद्धचा सामना भारतानं जिंकला. मात्र वेबसाईट ऑफलाईन झाल्यानं विजयाचे अपडेट्स करताना बीसीसीआयला मोठी अडचण झाल्याचं समजतंय . बीसीसीआयला आयसीसीकडून ४०५ मिलियन अमेरिकन डॉलर्स इतका महसूल मिळतो. तसेच सप्टेंबरमध्ये बीसीसीआयने २.५५ बिलियन अमेरिकन डॉलर्सला स्टार स्पोर्ट्सला आयपीएलचे मीडिया हक्क दिले आहेत असे असतानाही वेबसाईटचे नूतनीकरण करण्यात बीसीसीआय अपयशी ठरली आहे.

बीसीसीआयची वेबसाईट ही भारताच्या आणि देशांतर्गत सामन्यांचे स्कॉरबोर्ड बघण्यासाठी आणि बीसीसीआय बोर्डाच्या कामकाज आणि काही महत्वाच्या बातम्यांसाठी महत्वाची ठरत आहे. पण आता वेबसाईट बंद असल्याने बीसीसीआयसाठी समस्या उद्भवली आहे. त्यातच आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना होता आणि याच दिवशी वेबसाईट बंद आहे.

बीसीसीआयला आयसीसीकडून ४०५ मिलियन अमेरिकन डॉलर्स इतका महसूल मिळतो. तसेच सप्टेंबरमध्ये बीसीसीआयने २.५५ बिलियन अमेरिकन डॉलर्सला स्टार स्पोर्ट्सला आयपीएलचे मीडिया हक्क दिले आहेत असे असतानाही वेबसाईटचे नूतनीकरण करण्यात बीसीसीआय अपयशी ठरली आहे. विशेष म्हणजे हे डोमेन २०१०मध्ये आयपीएलचे अध्यक्ष ललित मोदी यांनी विकत घेतले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 4, 2018 11:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...