06 जुलै : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडच्या बॅटसमॅनला दुखापत झालीये.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, साऊथ आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्याआधी भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ कसून सराव करत आहे. या सरावाच्या दरम्यान अर्जुन तेंडुलकरने टाकलेल्या चेंडुवर
जॉनी बैरिस्टोला दुखापत झाली. दुखापत झाल्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं.
मागील वर्षी कसोटी सामन्यात जाॅनी बैरिस्टोने सर्वाधिक रन्स केले होते. आज अर्जुनच्या पहिल्याच चेंडूवर तो जखमी झाला. अर्जुनने टाकलेला याॅर्कर थेट त्याच्या अंगठ्यावर येऊन आदळला होता.
पण त्याला झालेली दुखापत जास्त गंभीर नसून जाॅनी बैरिस्टो साऊथ आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. येत्या 6 जुलैपासून इंग्लंड, साऊथ आफ्रिकेविरुद्ध चार कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे.
अर्जुन इंग्लंडमधील लाॅडर्स मैदानावर सराव करत आहे. त्याने अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी गोलंदाजी केलीये. अलीकडे पाकिस्तानचे माजी क्रिकेटर वसीम अकरम यांनीही कौतुक केलं होतं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा