जितकी भूक आहे, त्याच्या अर्धच खा; मिल्खा सिंग यांनी तरुणांना दिलेल्या 'या' फिटनेस टिप्स

सगळ्या आजारपणांचं मूळ पोटात आहे, असं आयुर्वेद सांगतो. मिल्खा सिंग (Milkha Singh) यांनी हे तत्त्व अंगीकारलं होतं. 'मी लोकांना सांगतो, की अर्धपोटी राहा', असं त्यांनी म्हटलं होतं.

सगळ्या आजारपणांचं मूळ पोटात आहे, असं आयुर्वेद सांगतो. मिल्खा सिंग (Milkha Singh) यांनी हे तत्त्व अंगीकारलं होतं. 'मी लोकांना सांगतो, की अर्धपोटी राहा', असं त्यांनी म्हटलं होतं.

  • Share this:
नवी दिल्ली 19 जून : फ्लाईंग सिख अशी ओळख असलेले विक्रमवीर धावपटू मिल्खासिंग (Milkha Singh) यांची कोरोनाशी झुंज अखेर अपयशी ठरली. 18 जून रोजी त्यांचं निधन झालं. चार-पाच दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचंही कोरोनामुळे निधन झालं होतं. मिल्खा सिंग 91 वर्षांचे होते; पण या वयातही त्यांची फिटनेसबद्दल (Fitness) असलेली आवड आणि मेहनत यात किंचितही घट झाली नव्हती. त्यांना फिटनेसचं किती महत्त्व होतं आणि फिटनेस राखण्यासाठीचं त्यांचं रहस्य काय होतं, याबद्दलचं वृत्त 'दैनिक भास्कर'ने दिलं आहे. फिटनेसचं महत्त्व कोणत्याही अॅथलीटसाठी (Athlete) अनन्यसाधारण असतं. प्रत्येक अॅथलीटने त्यासाठी स्वतःची अशी काही गणितं तयार केलेली असतात. त्यासाठीची बंधनं ते स्वतःहून काटेकोरपणे पाळतात. मिल्खा सिंगही त्याला अपवाद नव्हते. एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या फिटनेसबद्दल सांगितलं होतं. 'फिटनेसमुळेच बदल घडून येऊ शकतो. मी या वयातही जो काही चालू-फिरू शकतो, ते केवळ शारीरिक फिटनेसमुळेच शक्य झालं आहे,' असं ते म्हणाले होते. सगळ्या आजारपणांचं मूळ पोटात आहे, असं आयुर्वेद सांगतो. मिल्खासिंग यांनी हे तत्त्व अंगीकारलं होतं. 'मी लोकांना सांगतो, की अर्धपोटी राहा. चार पोळ्यांची भूक असेल, तर दोनच पोळ्या खा. पोट जितकं रिकामं राहील, तितके तुम्ही व्यवस्थित राहाल. सगळी आजारपणं पोटातूनच (Stomach) सुरू होतात, असं मी लोकांना कायम सांगायचो,' असं मिल्खा सिंग यांनी सांगितलं होतं. कोविडमुळे आईचं दुबईत निधन; 11 महिन्यांचा मुलगा अस्थी घेऊन मायदेशी परतला रोजच्या व्यायामाचं (Exercise) महत्त्वही त्यांनी एका कार्यक्रमात विशद केलं होतं. 'आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी दररोज 10 मिनिटं तरी काढणं गरजेचं आहे. बागेत जा किंवा रस्त्यावर जा, पण 10 मिनिटं वेगाने चाला. हाता-पायांच्या हालचाली होतील असे व्यायाम करा. खेळा-बागडा. शरीरात रक्त सळसळायला हवं, तसं झालं, तर आजारपणंही वाहून जातील. मला कधीही डॉक्टरांकडे जावं लागलं नाही. तुम्ही हे सगळं पाळलंत, तर तुम्हालाही कधी डॉक्टरकडे जायची वेळ येणार नाही,' अशा शब्दांत त्यांनी आपल्या आरोग्याचं रहस्य (Health Secret) लोकांना सांगितलं होतं. स्टार्स टेलच्या एका कार्यक्रमात मिल्खा सिंग यांनी युवा खेळाडूंसाठी प्रेरक भाषण केलं होतं. त्यात त्यांनी सांगितलं होतं, 'आजच्या काळी खेळाडूंना बराच पैसा मिळतो. खेळाची मैदानं सुसज्ज आहेत, अत्याधुनिक साधनं आहेत; पण 1960 मध्ये मिल्खासिंगने जो विक्रम केला होता, त्या विक्रमाला पुन्हा कोणी गवसणी घालू शकलेलं नाही, याची मला खंत आहे. तुमच्याकडे सगळं काही आहे; फक्त तुम्ही पुढे जाण्याची गरज आहे.' मोठी अपडेट: मुंबई लोकलसंदर्भात पालिका आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती 1958 साली सैन्यात जवान असताना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपण पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकलं होतं, तेव्हा पंडित नेहरूंकडून आपल्याला विचारणा झाली होती, की तुम्हाला काय हवं? त्यावर आपण फक्त एका दिवसाची सुट्टी मागितली होती, अशी आठवणही मिल्खा सिंग यांनी त्या कार्यक्रमात सांगितली होती.
Published by:Kiran Pharate
First published: