मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ सीरिजआधी विराट व्यंकटेश अय्यरला काय म्हणाला? ऑलराऊंडरने केला खुलासा

IND vs NZ सीरिजआधी विराट व्यंकटेश अय्यरला काय म्हणाला? ऑलराऊंडरने केला खुलासा

आयपीएल 2021 च्या (IPL 2021) दुसऱ्या राऊंडमध्ये व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) धमाकेदार कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर व्यंकटेश अय्यरची न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 सीरिजसाठी टीम इंडियात (India vs New Zealand) निवड झाली आहे.

मुंबई, 10 नोव्हेंबर : आयपीएल 2021 च्या (IPL 2021) दुसऱ्या राऊंडमध्ये व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) धमाकेदार कामगिरी केली. केकेआरकडून खेळणाऱ्या या ऑलराऊंडरने आयपीएलच्या 10 मॅचमध्ये 370 रन केले आणि 3 विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे व्यंकटेश अय्यरची न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी टीम इंडियामध्ये (India vs New Zealand) निवड झाली. अय्यर नेट बॉलर म्हणून टी-20 वर्ल्ड कपमध्येही टीम इंडियाचा भाग होता. त्यावेळी ट्रेनिंग सेशनवेळी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) अय्यरशी संवाद साधला आणि त्याला मोलाचा सल्ला दिला. खुद्द व्यंकटेश अय्यरनेच याचा खुलासा केला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना अय्यर म्हणाला, 'मी बहुतेक ज्येष्ठ खेळाडूंसोबत चर्चा केली. तू जे करत आहेस, त्यावर लक्ष केंद्रीत कर. तू चांगलं करत आहेस. कठोर मेहनत सुरू ठेव, असं विराटने सांगितलं. विराटचा हा सल्ला मी कायम लक्षात ठेवेन.'

विराट कोहली टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार होता, पण आता त्याने टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजपासून रोहित शर्माकडे टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. रोहितच्या कॅप्टन्सीमध्ये खेळण्यासाठी आपण उत्सुक आहोत, असं व्यंकटेश अय्यरने सांगितलं.

'मी रोहितच्या नेतृत्वात खेळण्यासाठी उत्सुक आहे. तो सर्वोत्तम बॅटर आहे, त्यामुळे त्याच्याकडून खेळाचे बारकावे शिकण्याची संधी आहे. निवड झालेली टीम मजबूत आहे, त्यामुळे आम्ही चांगली कामगिरी करू. माझ्यासारख्या युवा खेळाडूला शिकण्याचा मोठा अनुभव मिळेल. रोहितच्या नेतृत्वात खेळणं रोमांचक असेल,' अशी प्रतिक्रिया व्यंकटेश अय्यरने दिली.

'टीम इंडियामध्ये निवड झाल्यामुळे मी खूश आहे. यासाठी मी कठोर मेहनत केली आहे. टीममध्ये निवड होईल, असं मला अजिबात वाटलं नव्हतं. प्रत्येकवेळी मैदानात जातो, तेव्हा मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या टीमसाठी सर्वाधिक रन करायचे आणि जास्त विकेट घ्यायची माझी इच्छा असते. निवड समिती, कर्णधार, कोच आणि सगळ्या ज्येष्ठ खेळाडूंचा मी आभारी आहे. मी खूप आनंदी आहे. टीम इंडियात माझी निवड झाल्याचं मला आवेश खानने सांगितलं,' असं व्यंकटेश अय्यर म्हणाला.

व्यंकटेश अय्यरने आयपीएल 2021 मध्ये 10 मॅच खेळून 370 रन केले, यामध्ये 4 अर्धशतकं होती, याशिवाय त्याने 3 विकेटही घेतल्या. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही व्यंकटेशने ऑलराऊंड कामगिरी केली. 5 मॅचमध्ये त्याने 155 रन केले आणि सोबतच 5 विकेट घेतल्या.

First published:

Tags: Team india