नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर: टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) स्कॉटलंडला मात दिल्यानंतर भारत 2 विजयांसह 4 गुण घेऊन तिसऱ्या स्थानावर गेला आहे. नेट-रनरेटच्या (net run rate) जोरावर भारताने अफगाणिस्तानला मागे टाकलं आहे. तसं पाहायाला गेलं तर भारताचा रनरेट पाकिस्तान आणि न्यूझीलंडपेक्षाही अधिक आहे. पण, टीम इंडियाचे भवितव्य न्यूझीलंडच्या पराभवावर अवलंबून आहे. दरम्यान, सध्या क्रिकेट जगतात नेट-रनरेटची चर्चा अधिक रंगली आहे. तर जाणून घेऊया..नेट रनरेट म्हणजे काय ? आणि कसे असते कॅलकुलेशन?
हा नेट रनरेट कुठल्याही सामन्यात खेळलेल्या संघाच्या दोन्ही डावांवरून काढला जातो. म्हणजेच फलंदाजी करताना डावात किती षटके खेळली, किती धावा केल्या आणि गोलंदाजी करताना किती षटकांमध्ये किती धावा गमावल्या, या आधारावरून हा नेट रनरेट काढला जातो. तेव्हा पहिल्या डावातून दुसऱ्या डावाची सरासरी वजा केली जाते आणि नेट रनरेट काढला जातो.
एकूण बनवलेल्या धावा/एकूण खेळलेली षटके-एकूण गमावलेल्या धावा/एकूण फेकलेली षटके=नेट रनरेट
विरुद्ध पाकिस्तान - 151/7 - 20 षटके
विरुद्ध न्यूझीलंड - 110/7 - 20 षटके
विरुद्ध अफगाणिस्तान - 210/2 - 20 षटके
विरुद्ध स्कॉटलंड - ८९/२ - ६.३ षटके
भारताने 66.3 षटकात 560 धावा केल्या. गणना करण्यासाठी 66.5 षटकांचा समावेश केला जाईल.
भारताने केलेल्या एकूण धावा - 560/66.5 = 8.42
नेट रन रेट मोजताना विकेट्स मोजल्या जात नाहीत. जर संघ त्यांच्या निर्धारित 20 षटकांपूर्वी सर्वबाद झाला, तर संपूर्ण 20 षटके विचारात घेतली जातील नाहीतर त्यांची खेळलेली षटके मोजली जातील.
पाकिस्तान - 152/10 - 17.5 षटके
न्यूझीलंड - 111/2 - 14.3 षटके
अफगाणिस्तान - 144/7 - 20 षटके
स्कॉटलंड - 85 सर्वबाद - 17.4 षटके
72.2 आणि 492 मध्ये एकूण धावा केल्या ज्या 72.33 षटकात मोजल्या जातील.
एकूण धावा - 492/72.33 = 6.802
तर भारताचा नेट रन रेटचे गणित. 8.421- 6.802म्हणजे 1.619
अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवले तर त्यांना महत्त्वाचे दोन गुण मिळतील. त्याला 6 गुण मिळतील. यानंतर भारताला शेवटचा सामना नामिबियाविरुद्ध खेळायचा आहे. भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी 6 गुण असतील. यानंतर त्रिकोणी लढतीत निव्वळ धावगतीच्या आधारावर कोणता संघ सेमी फायनलमध्ये जाणार हे ठरविले जाईल.
भारताचा नेट रन रेट खूपच चांगला आहे. चार सामन्यांनंतर त्याचा निव्वळ धावगती +1.619 आहे. या आधारावर भारत आघाडीवर आहे. नामिबियाविरुद्धच्या त्याच्या विजयाचा फरकही खूप महत्त्वाचा ठरणार आहे. जरी अफगाणिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला आणि त्यांचा निव्वळ धावगती सुधारला, जो सध्या +1.481 आहे, तरीही त्यांना टीम इंडियाला मागे टाकणे कठीण बननार आहे.
टी-20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) ग्रुप १ मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि ग्रुप २ मध्ये न्यूझीलंड, भारत आणि अफगाणिस्तान सेमीफायनलच्या शर्यतीत आहेत. टी-20 वर्ल्ड कप अतिंम टप्प्यात पोहोचला आहे. स्पर्धेच्या उपांत्य सामन्यासाठी दोन्ही ग्रुपमधील एक एक संघ पक्के झाले आहेत, तर काही संघ उपांत्य सामन्यात स्थान पक्के करण्यासाठी संघर्ष करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 cricket, T20 league, Team india