IPL 2019 : चार हजार दिवसांपूर्वी झाला होता चेपॉकवर धोनीचा पराभव

IPL 2019 : चार हजार दिवसांपूर्वी झाला होता चेपॉकवर धोनीचा पराभव

तब्बल 11 वर्षांआधी पहिला आणि शेवटचा विजय विराटच्या बंगळुरू संघाने धोनीच्या होम ग्राऊंडवर मिळवला होता.

  • Share this:

चेन्नई, 23 मार्च : अवघ्या काही तासांत आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरूवात होणार असून, पहिलीच लढत महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्यात होणार आहे. हा सामना 8 वाजता धोनीच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर होणार असून आजची रात्र ही ‘यलो नाईट’ होणार यात काही वाद नाही. दरम्यान कोहली आणि धोनी यांच्यातील चेपॉकवरील इतिहास पाहता, चेपॉकवर धोनीचं कायम वर्चस्व राहिले आहे. पण अशीही एक वेळ होती, जेव्हा धोनीच्या घरच्या मैदानावर कोहलीच्या बंगळुरू संघाने त्याला नमविले होते. हे घडले तेव्हा, जेव्हा विराट कोहली भारतासाठी खेळतही नव्हता. ही घटना होती, 21 मे 2008ची, म्हणजेच IPLच्या पहिल्या हंगामाची. तब्बल 11 वर्षांआधी पहिला आणि शेवटचा विजय विराटच्या बंगळुरू संघाने धोनीच्या होम ग्राऊंडवर मिळवला होता.

21 मे 2008 रोजी झालेल्या बंगळुरू आणि चेन्नई यांच्यात चेपॉकवर झालेल्या सामन्यादरम्यान बंगळूरूचे कर्णधारपद भारताच्या वॉलकडे म्हणजे राहुल द्रविडकडे होते. आश्चर्याची बाब म्हणजे, या सामन्यात धोनी विरुध्द राहुल द्रविड असा सामना रंगला होता. या सामन्यात  द्रविडने 39 बॉलमध्ये 47 धावांची धडाकेबाज फलंदाजी करत चेन्नईला 126 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, अनिल कुंबळेच्या भेदक गोलंदाजीपुढे धोनीचे किंग्ज टिकू शकले नाही, आणि 14 धावांनी बंगळुरूने  हा सामना जिंकला. यानंतर मात्र, बंगळुरू संघाने कधीच धोनीला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवण्याचे धैर्य दाखवले नाही. त्यामुळे आज तब्बल 11 वर्ष आणि 4 हजार दिवसांनी होणाऱ्या चेन्नई विरुद्ध बंगळुरू या सामन्यात विराट कोहली धोनीला हरवेल का? याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.

VIDEO: उदयनराजे म्हणाले...'मी जे बोललोच नाही, ते दाखवले गेले'

First published: March 23, 2019, 5:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading