मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs Aus: लोकेश राहुलचा सिक्सर बघून तुम्हीही म्हणाल... ‘व्हॉट अ शॉट!’, पाहा Video

Ind vs Aus: लोकेश राहुलचा सिक्सर बघून तुम्हीही म्हणाल... ‘व्हॉट अ शॉट!’, पाहा Video

लोकेश राहुल

लोकेश राहुल

Ind vs Aus: मोहाली टी20त लोकेश राहुल ऑस्ट्रेलियन गोलंदाजीवर अक्षरश: तुटून पडला. पण तिसऱ्याच ओव्हरमध्ये त्यानं स्क्वेअर लेगच्या वरुन मारलेला सिक्स डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला.

  • Published by:  Siddhesh Kanase
मोहाली, 20 सप्टेंबर: टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुलनं आशिया कपमधला आपला फॉर्म कायम राखला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20त राहुलनं खणखणीत अर्धशतक ठोकलं. मोहालीतल्या या सामन्यात राहुल ऑस्ट्रेलियन गोलंदाजीवर अक्षरश: तुटून पडला. पण तिसऱ्याच ओव्हरमध्ये त्यानं स्क्वेअर लेगच्या वरुन मारलेला सिक्स डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला. व्हॉट अ शॉट.. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी गोलंदाज जोश हेझलवूडकडे फिंचनं तिसरी ओव्हर सोपवली. त्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर लोकेश राहुलनं स्क्वेअर लेगच्या वरुन उत्तुंग षटकार खेचला. हा सिक्स पाहून टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मादेखील अवाक झाला. राहुलचं सलग दुसरं अर्धशतक राहुलनं आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 62 धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा एकदा राहुलच्या बॅटमधून मोठी खेळी आली. त्यानंत 35 बॉलमध्ये 55 धावा फटकावल्या. त्यात 4 फोर आणि 3 सिक्सर्सचा समावेश होता. राहुलचं आंतरराष्ट्रीय टी20तलं हे आजवरचं 18वं अर्धशतक ठरलं. पंड्या-सूर्यकुमारची फटकेबाजी राहुलसह मधल्या फळीतल्या सूर्यकुमार यादव आणि लोकेश राहुलनंही तुफान फटकेबाजी केली. सूर्यकुमारनं 25 बॉल्समध्ये 46 धावा फटकावल्या. तर हार्दिक पंड्यानं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करताना 30 बॉल्समध्ये 71 धावा कुटल्या. त्यामुळे भारतानं 20 ओव्हरमध्ये सहा बाद 208 धावांचा डोंगर उभारला.
First published:

Tags: Cricket, Sports

पुढील बातम्या