पर्थ(ऑस्ट्रेलिया) 22 फेब्रुवारी: कर्णधार स्टेफनी टेलरच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर वेस्ट इंडिजने आयसीसी महिला टी 20 वर्ल्डकपमध्ये जबरदस्त विजय संपादन केला. शनिवारी (22 फेब्रुवारी) पर्थमध्ये पहिल्यांदा खेळत असलेल्या थायलंडचा विंडिजने 20 बॉल आणि 7 विकेट्स राखून पराभव केला. थायलंडच्या संगाने पहिली फलंदाजी करताना 9 विकेट्सच्या मोबदल्यात केवळ 78 रन्स बनवल्या. थांयलंडकडून विकेटकिपर नानापाट 33 रन्स आणि नारुमल चेवेई 13 रन्स या दोघींनाच दुहेरी धावसंख्या उभारता आली. टेलरने 3 षटकांमध्ये 13 रन्स देऊन 3 विकेट घेतल्या. तर थायलंडने चांगली गोलंदाजी आणि जबरदस्त क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सोप्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विंडिजला झुंजवलं.
थायलंडचा संघ पहिल्यांदाच कोणत्यातरी मोठ्या टूरनामेंटमध्ये खेळत होता. मात्र त्यांन आपल्या जबरदस्त बॉलिंग आणि फिल्डिंगने सगळ्यांना प्रभावित केलं. तर हार पत्करावी लागल्यानंतरही थायलंडच्या खेळाडू आणि चाहत्यांच्या प्रतिक्रियांनी मनं जिंकली.
Thailand bow to all corners of the ground after their first World Cup game 🙏
Who else loves the spirit that they bring to the sport?#T20WorldCup | #WIvTHA pic.twitter.com/YsntKnw9nP — T20 World Cup (@T20WorldCup) February 22, 2020
वेस्टइंडिजच्या पहिल्या क्रमांकाला जोरदार धक्का देत थायलंडने विंडिजची अवस्था त्यांनी 7 व्या ओव्हरमध्ये 3 विकेट्सवर 27 रन्स अशी दयनीय केली होती. यामध्ये सलामीवीर हेली मॅथ्यूजचाही समावेश होता. ती 16 रन्स करून तंबूत परतली. त्यानंतर कॅप्टन टेलरसुद्धा 37 बॉल्समध्ये 26 रन्स काढून माघारी परतली. आणि शेमाइन कँपबेल 27 बॉल्समध्ये 25 धावा काढून परतली. तर त्यांच्या 2 फलंदाजांना रन आऊट करण्यात थायलंडचा संघ यशस्वी झाला. वेस्ट इंडिजसारख्या तगड्या संघाची अशी अवस्था केली ती थायलंडच्या जबरदस्त बॉलिंग आणि फिल्डिंगने.
"I've got to tell you, I'm feeling a little bit under-dressed!"
Insider @neroli_meadows meets some colourful 🇹🇭 fans, in high spirits despite their team's defeat.#WIvTHA | #T20WorldCup pic.twitter.com/sPZblpZBDP — T20 World Cup (@T20WorldCup) February 22, 2020
थायलंडने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्सच्या मोबदल्यात केवळ 78 धावा केल्या. जे लक्ष्य वेस्ट इंडिजच्या संघाने 20 बॉल शिल्लक ठेवत 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. थायलंडकडून खेळताना नानपाट कोंचारोओनकाईने सर्वाधिक 33 धावा केल्या. तिच्या व्यतिरिक्त नारुमल चेवेईने 13 रन्सचं योगदान दिलं. मात्र थायलंडचे बाकीचे फलंदाज दुहेरी धावसंख्याही उभारु शकल्या नाहीत.
तर वेस्ट इंडिजची कर्णधार टेलरला तिच्या जबरदस्त बॉलिंग आणि बॅटिंगसाठी प्लेयर ऑफ द मॅच असा पुरस्कार देण्यात आला.
रहाणेच्या चुकीनंतर इशांतनं इंडियाला तारलं, न्यूझीलंडकडे 51 धावांची आघाडी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Women t20 world cup